आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक




आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. राज्यातील विविध भागांतून लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होत असतात. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन नागपूर, नवी अमरावती, खामगाव आणि भुसावळ येथून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.










नागपूर ते मिरज या मार्गावर गाडी क्रमांक ०१२०५ ही विशेष ट्रेन २३ आणि २४ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१२०६ ही २४ आणि २५ जुलै रोजी मिरजहून दुपारी १२.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला पंढरपूरसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा असेल.


नवी अमरावती ते पंढरपूर विशेष गाडी क्रमांक ०१११९ ही २१ आणि २४ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०११२० ही २२ आणि २५ जुलै रोजी रात्री ७.३० वाजता पंढरपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी १२.५० वाजता नवी अमरावतीला पोहोचेल.


खामगाव ते पंढरपूर मार्गावर गाडी क्रमांक ०११२१ ही २१ आणि २३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०११२२ ही २२ आणि २४ जुलै रोजी पहाटे ५ वाजता पंढरपूरहून सुटून त्याच दिवशी रात्री ७.३० वाजता खामगावला पोहोचेल.



भुसावळ ते पंढरपूर विशेष गाडी क्रमांक ०११५९ ही २४ आणि २५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०११६० ही २५ आणि २६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता पंढरपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता भुसावळला पोहोचेल.


या विशेष गाड्यांमुळे आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट आगाऊ आरक्षित करून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.






Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि