BMC News : बेस्ट उपक्रमाने, महापालिकेपुढे पसरला शेवटचा हात

बेस्टची समक्षीकरणाच्या दिशेने वाटचाल


मुंबई : तोट्यात चाललेल्या बेस्टला (BEST) आर्थिक सक्षम करण्यासाठी महापालिकेच्यावतीने १ हजार कोटींची आर्थिक मदत दिली जात असली या मदतीसाठी आम्ही परत येणार नाही. हे आम्ही शेवटचेच येत असून पुढील आर्थिक वर्षांपासून बेस्टची स्थिती आर्थिक सक्षम होईल,असे बेस्टचे महाव्यवस्थाप सोनिया सेठी यांनी स्थायी समितीच्या सभेत ग्वाही दिली. तसेच महापालिकेने दिलेल्या ५०० कोटी रुपयांपैंकी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीसाठीसाठी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेने अजुन १३०० कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी सेठी यांनी केली आहे.



बेस्ट उपक्रमाला महापालिकेच्यावतीने आर्थिक मदत केली जात असली तरी या केलेल्या निधीचा हिशोब दिला जावा अशा प्रकारचे निर्देश स्थायी समितीने दिल्यानंतर बेस्टचे महाव्यवस्थापक सोनिया सेठी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित राहिल्या. यावेळी बेस्टला देण्यात आलेली रक्कम आणि त्याचा हिशोबासह इतर बाबींची माहिती देताना सेठी यांनी कामगारांच्या संपाच्या बैठकीत निर्णय घेताना असा निर्णय घेण्यात आला की निवृत्त कामगारांची थकित ग्रॅज्युएटीची रक्कम या वर्षांत एक रकमी देण्यात यावी तसेच पुढील तीन वर्षांत ५ हजार स्वमालकीच्य बसेस घेण्यात येतील व त्यासाठीच आर्थिक पध्दतीने शोधण्यात येतील अशी माहिती दिली. त्यामुळे बेस्टच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न सुरु असून महापालिकेकडे आर्थिक मदत मागण्याचे हे आमचे शेवटचे वर्ष असेल. आता बेस्टचा कायापालट केल्यानंतर उपक्रम स्वावलंबी होईल. याची फलश्रुती पुढील वर्षांपासून दिसून येईल आणि महसूल वाढला जाईल. आता बेस्ट स्वमालकीच्या गाड्या घेणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली बेस्टच्या समक्षीकरणासाठी पाऊल उचलले आहे.


बेस्टला दिल्या जाणाऱ्या १ हजार कोटी रुपयांच्या अनुदानापैंकी ५०० कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. त्यातून आतापर्यंत निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीसाठी रक्कम दिली जाईल. आतापर्यंत आपण मार्च २०२४ पर्यंतच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना देवू शकलो. सन २०२४ ते मार्च २०२६ पर्यंतच निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ११८८ कोटी रुपयांची गरज आहे. तर मार्च २०२७ पर्यंत १७५१ कोटी रुपयांची गरज भासणार आहे. त्यामुळे ५०० कोटी वगळता अजून १३०० कोटी रुपयांच्या निधीची गरज असल्याचे सेठी यांनी सांगितले.



यावेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी, मुंबईकरांसाठी ही आनंदाची गोष्ट असून बेस्ट समक्षीकरणसाठी वाटचाल करत असल्याचे सांगितले. हे शेवटचे वर्ष असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ५ जून रोजी झालेल्या बैठकी घेत राज्य सरकारने बेस्टच्या सक्षमीकरणासाठी पाऊल उचलले आहे. बेस्टला २६०० कोटी रुपयांची तुट आहे. त्यामुळे १३०० कोटी रुपयांची आर्थिक मदत मागितली आहे. आणि आपण देत असलेली रक्कम निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीसाठी वापरले जाते ही आनंदाची गोष्ट असल्याचे शिंदे यांनी सांगून यासाठी लवकरच याबाबत विशेष बैठकीचे आयोजन केले जाईल असे स्पष्ट केले.



सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची थकीत रक्कम


१ जून २०२४ ते ३१ मार्च २०२६ : ११८८ कोटी रुपये


१ एप्रिल २०२६ ते ३१ मे २०२६ : ११२ कोटी रुपये


१ जून २०२६ ते ३१ मार्च २०२७ : ४५१ कोटी रुपये


एकूण : १७५१ कोटी रुपये

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.