FIFA World Cup 2026 Neymar : ९८१ दिवसांनंतर ब्राझीलसाठी मैदानात उतरला नेमार, चाहत्यांचा जल्लोष

इंग्लंड : ब्राझील विरुद्ध स्कॉटलंड (Brazil vs Scotland) सामन्यात तब्बल ९८१ दिवसांनंतर स्टार फुटबॉलपटू नेमार (Neymar) याने ब्राझीलच्या प्रतिष्ठित क्रमांक १० जर्सीत मैदानावर पुनरागमन केले. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) स्पर्धेतील ग्रुप-C च्या अखेरच्या सामन्यात प्रशिक्षक कार्लो अँचेलोटी (Carlo Ancelotti) यांनी ७६व्या मिनिटाला नेमारला मैदानात उतरवताच स्टेडियममधील ६४ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी जल्लोष केला.





९८१ दिवसांनंतर ब्राझीलसाठी पुनरागमन


३४ वर्षीय नेमारने ब्राझीलकडून शेवटचा सामना १७ ऑक्टोबर २०२३ रोजी उरुग्वेविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात त्याला एसीएल (ACL) आणि मेनिस्कस (Meniscus) दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने आपल्या बालपणीच्या क्लब सॅंटोस (Santos) कडून पुनरागमन केले. आता प्रशिक्षक अँचेलोटी यांनी सुरुवातीचे दोन ग्रुप सामने खेळवले नाहीत, मात्र स्कॉटलंडविरुद्ध त्याला संधी देत बाद फेरीत त्याच्यावर विश्वास असल्याचे संकेत दिले.



अँचेलोटींचा मोठा निर्णय


६७ वर्षीय कार्लो अँचेलोटी यांनी सामन्यापूर्वीच नेमारला खेळवण्याचे संकेत दिले होते. ब्राझीलने ३-० अशी आघाडी घेतल्यानंतर ७६व्या मिनिटाला मॅथ्यूस कुन्हा (Matheus Cunha) याच्या जागी नेमार मैदानात उतरला. कुन्हाने ६०व्या मिनिटाला ब्राझीलसाठी तिसरा गोल केला होता.



सलग चौथ्या विश्वचषकात नोंद


या सामन्यासह नेमारने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. तो सलग चार फिफा (FIFA) विश्वचषक (World Cup) स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या मोजक्या दिग्गज फुटबॉलपटूंमध्ये सामील झाला. ब्राझीलसाठी १२९ सामन्यांत ७९ गोल करणाऱ्या नेमारच्या पुनरागमनाने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



सामन्यानंतर भावुक झाला नेमार


सामना संपल्यानंतर नेमार आपल्या भावना लपवू शकला नाही. कॅमेऱ्यांमध्ये त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसून आले. त्यानंतर तो आपल्या जोडीदार आणि मुली मावी (Mavie) व मेल (Mel) यांना भेटला. दोन्ही मुलींना वारंवार मिठी मारत आणि त्यांच्यासोबत खेळताना त्याचा व्हिडीओ सोशल मीडिया (Social Media) वर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) झाला आहे. नेमारचे पूर्ण तंदुरुस्त होऊन मैदानात पुनरागमन झाल्याने ब्राझीलच्या चाहत्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहे.




Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून