Suicide News: धक्कादायक! वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी; ठाण्यातील व्यावसायिकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वरळी सी लिंकवरून (Worli Sea Link) एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित व्यक्तीला समुद्रातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तात्काळ नायर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. (Suicide News)


मृत व्यक्तीची ओळख भावेश मजेडिया (वय ५१) अशी झाली आहे. ते ठाणे येथील रहिवासी असून व्यवसाय करत होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.



या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात आर्थिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस विविध बाजूंनी तपास करत आहेत.



या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. पोलिसांकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची चौकशी तसेच इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून तपासानंतरच या प्रकरणातील संपूर्ण माहिती समोर येणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी देखील एका तरुणाने वांद्रे सी लिंक वरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना होती.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून