Solar Tree and Solar Gazebo : मुंबईतील तीन उद्यानांमध्ये सोलर ट्री आणि सोलर गॅझेबो

दरवर्षी अंदाजे १.२४ लाख युनिट वीज निर्मिती


मुंबई :  मुलुंड (पूर्व) मधील डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उद्यान तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मनोरंजन मैदान आणि जोगेश्वरी येथील शिल्पग्राम उद्यान या तीन ठिकाणी सौर वृक्ष (सोलर ट्री) उभारण्यात आले आहेत. तसेच, शिल्पग्राम उद्यानात सोलर गॅझेबो देखील उभारण्यात आले आहे. या तिन्ही उद्यानांमध्ये उभारण्यात आलेल्या सोलर ट्री आणि सोलर गॅझेबो संरचनांची एकूण स्थापित क्षमता सुमारे ६९.३ किलोवॅट आहे. त्यातून दरवर्षी अंदाजे १.२४ लाख युनिट वीज निर्मिती होणार आहे. यामुळे सुमारे ८२ हजार किलो कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन रोखले जाणार आहे. परिणामी, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.


मुलुंड (पूर्व) मधील डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उद्यानाला आता स्वच्छ ऊर्जेची नवी ओळख मिळाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मेसर्स नयारा एनर्जी लिमिटेड यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या 'सौर वृक्ष' (Solar Tree) प्रकल्पाचे लोकार्पण मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते गुरुवारी २५ जून २०२६ रोजी या उद्यानात करण्यात आले.





याप्रसंगी नगरसेविका हेतल गाला मोरवेकर, नगरसेविका अनिता वैती, उपआयुक्त (उद्याने) अजीतकुमार आंबी, उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, मेसर्स नयारा एनर्जी लिमिटेडचे अधिकारी, इमॅजिन पॉवर ट्री कंपनीचे चेअरमन शनी पांड्या, मयंक पटेल, राहुल बाणावली यांच्यासह विविध मान्यवर व स्थानिक नागरिक उपस्थित होते.


'सौर वृक्ष' (Solar Tree) उपक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक उद्यानांचे रूपांतर केवळ विरंगुळ्याच्या जागांपुरते मर्यादित न राहता ऊर्जा निर्मिती करणाऱ्या स्मार्ट हरित केंद्रांमध्ये करणे हा प्रमुख उद्देश आहे. मुंबई महानगरपालिका स्वच्छ ऊर्जा, पर्यावरण संवर्धन आणि नागरिक-केंद्रित विकास यांचा प्रभावी समन्वय साधत आहे. भविष्यात अशा प्रकारचे प्रकल्प अधिक व्यापक प्रमाणावर राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे उद्गार मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काढले.



या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प जागेत जास्तीत जास्त ऊर्जा निर्मिती करण्याची क्षमता होय. पारंपरिक सौर प्रकल्पांच्या तुलनेत या तंत्रज्ञानामुळे सुमारे ९५ ते ९८ टक्के जागेची बचत होत असल्याने, मुंबईसारख्या मर्यादित जागेच्या शहरांसाठी हा अत्यंत उपयुक्त आणि व्यवहार्य पर्याय ठरत आहे.


झाडाच्या आकारात उभारलेले सोलर ट्री हे या प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण आहे. ते केवळ ऊर्जा निर्मिती करत नाहीत, तर उद्यानांच्या सौंदर्यातही भर घालतात आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतात. त्याचबरोबर सोलर गॅझेबो ही संरचना नागरिकांना सावली व विश्रांतीची सुविधा उपलब्ध करून देत असताना वीज निर्मितीही करते. त्यामुळे ‘विश्रांती आणि ऊर्जा’ यांचा सुंदर संगम या प्रकल्पातून साधला गेला आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.