BMC : इतर प्राधिकरणांच्याा जमिनीवर विकासकामे करताना अडचणींचा डोंगर

अतिरिक्त आयुक्तांनी दिला समन्वय राखण्याचा सूचना


मुंबई : मुंबईतील (Mumbai) विविध प्राधिकरणांच्या हद्दीत आरोग्य व्यवस्थेसह इतर व्यवस्था पुरवण्यात येणाऱ्या अडचणींबाबत सभागृहात जोरदार चर्चा झाली. महापालिकेच्यावतीने विकासकामे करताना इतर प्राधिकरणांकडून परवानगी मिळण्यास होणाऱ्या विलंबाबाबत अडचणींचा डोंगरच निर्माण होत असल्याची खंत सर्व नगरसेवकांनी मांडून याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे यापुढे विविध प्राधिकरणांसोबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी समन्वय राखून विकासकामांना गती द्यावी असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले जातील अशी ग्वाही महापालिका सभागृहात अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी दिली.


मुंबईत महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या अखत्यारीतील मुंबई (Mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण, मुंबई बंदर विश्वस्त आणि इतर शासकीय प्राधिकरणांच्या मालकीच्या जमिनी देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. या वसाहतींमध्ये राहणारे नागरिक हे महानगरपालिकेचे करदाते व मतदार असूनही, संबंधित प्राधिकरणांच्या परवानगी अभावी त्यांना महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य व इतर आवश्यक मूलभूत नागरी सुविधा पुरविताना अनेक अडचणी येतात. परिणामी, वसाहतींमधील नागरिकांना आवश्यक सेवासुविधांपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे या विविध प्राधिकरणांच्या मालकीच्या जमिनींवरील वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना महानगरपालिकेमार्फत आरोग्य व इतर मूलभूत सुविधा पुरविण्याच्यादृष्टीने आवश्यक परवानग्या मिळण्याकरिता ठोस उपाययोजना करण्यासाठी महापालिका सभेत ६६ ब अन्वये चर्चा घडवून आणली.



यावर अश्रफ आझमी, तृष्णा विश्वासराव, सचिन पडवळ, राखी जाधव, अंजली नाईक,प्रकाश दरेकर, संगीता कोळी, कवणकर, सावे, यादव, संध्या दोषी आदींनी चर्चेत भाग घेतला आणि विविध प्राधिकरणांकडून नागरी कामे करताना कशाप्रकारे परवानगी अभावी कामे करण्यात अडचणी येत असल्याची व्यथा मांडली.


यावर प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी बिगर मालकीच्या जागांवर आरोग्य, स्वच्छता तसेच पयावरणदृष्ट्या सेवा सुविधा पुरवताना कोणत्याही प्रकारची परवानगी संबंधित प्राधिकरणांकडून नाकारली जावू नये. यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी समन्वय राखणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत आपण कचरा, स्वच्छता, पाणी तसेच आरोग्य विषयक बाबींची सेवा बीपीटी,म्हाडा, एमएमआरडीए, रेल्वे, जिल्हाधिकारी यांच्या जागांवर देत आहोत. त्यानुसारच शाळेचे बांधकाम करण्यासाठी इतर प्राधिकरणाकडून शुल्क आकारणी केले जावू नये.


मुंबई बीपीटी : दारुखाना, रे रोड, वडाळा शिवडी इथे कचरा उचलणे


एमएमआरडीए (MMRDA): बीकेसी क्षेत्र, रस्ते स्वच्छता, कचरा उचलणे


जिल्हाधिकारी जमिनी : गोवंडी, मानखुर्द ,मालाड,कांदिवली झोपडपट्टी स्वच्छता, शौचालय


रेल्वे क्षेत्र : कुर्ला, शीव, वांद्रे, जोगेश्वरी कचरा संकलन


मिठागराच्या जमिनी : भांडुप, मुलुंड,कांजूरमार्ग, विक्रोळीतील रस्ता स्वच्छता व शौचालय सुविधा

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.