Cyber Crime : गरीब विद्यार्थींनीवर आयकर विभगाकडून २० कोटीचे नोटीस ! सत्यसमोर येताच कुटुंबीयाच्या पायाखालची जमीन हादरली; नेमकं प्रकरण काय ?

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका सामन्या कुटुंबातील महाविद्यालयीन विद्यार्थीनीला आयकर विभागाने २० कोटी रूपयांची नोटीस बजावली आहे. हा व्यवहार विद्यार्थीनीच्या बँक खात्यातून झाल्याचे सांगीतले जात आहे. ज्यावेळी एवढ्या मोठ्या रकमेची नोटीस आली , तेव्हा विद्यार्थिनीसह तिच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन हादरली.




गरीब बापाची पोरगीवर २० कोटीचा नोटीस !


उन्नावमधील गिरिजाबाग परिसरात राहणारी रश्मि सविता ही सध्या महाविद्यालयीन विद्यार्थीनी असून ती पदवीचं शिक्षण घेत आहे. रश्मिचे वडील अजय शंकर हे मजदूर म्हणून इमरातीच्या बांधकामा मध्ये काम करताता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या कुटुंबाला जेव्हा आयकर विभागाची नोटीस मिळाली, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. रश्मिच्या विरोधात आयकर विभागाने आयकर कायद्याच्या कलम १३१ च्या अंतर्गत नोटीस जारी केली आहे.




रश्मिच्या नवावर कंपनी ?



मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिच्या (Rashmi) नावावर दिल्लीतील बुराडी परिसरात 'आरएस एंटरप्राइजेज' (RS Enterprises) नावाची एक कंपनी सुरू असल्याचे समोर आले आहे. रश्मिने दावा केला आहे की, कोणी तरी अज्ञात फसवणूक करणाऱ्या टोळीने तिच्या नकळत तिचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरून बनावट कंपनी स्थापन केली आहे. याच कंपनीच्या नावावर हा व्यवहार झाल्याचे सांगीतले जात आहे.




या बनावट कंपनीची स्थापना २०२५ साली झाली. अवघ्या काही महिन्यांतच म्हणजे ९ मे २०२५ रोजी ही कंपनी बंदही करण्यात आली होती.या काही महिन्यांच्या कालावधीत कंपनीच्या माध्यमातून तब्बल २०.९८ कोटी रुपयांची (Worth ₹20.98 crore) उलाढाल आणि व्यावसायिक व्यवहार करण्यात आले. त्यामुळे आयकर विभागाने रश्मिला नोटीस पाठवून जाब विचारला. रश्मिने स्पष्ट केलं आहे की, या कंपनीशी आणि या व्यवहाराशी तिचा काहीही संबंध नाही आहे. याशिवाय तिने आपले शासकिय कागदपत्रांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्यामुळे तिने सार्वजनिक तक्रार निवारण पोर्टलवर आपली तक्रार नोंदवली आहे. तसेच, या संपूर्ण फसवणुकीची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, यासाठी तिने स्थानिक पोलीसांकडेही लेखी अर्ज दिला आहे. आता हे ट्रान्झेक्शन्स कुणी केले? याचा तपास आयकर विभागाकडून केला जात आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Nashik : गणेशोत्सवापूर्वी नाशिक पोलिस ॲक्शन मोडमध्ये ! नाशिकमध्ये मुक्काम असलेल्या तडीपार गुन्हेगारांची ‘धरपकड’ मोहीम

Nashik : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख