Mahim Crime : धक्कादायक! मोबाईलच्या किरकोळ वादावरून थेट चाकूचे सपासप वार; माहिम स्टेशनबाहेर तरुणावर हल्ला

मुंबई : मुंबईत किरकोळ कारणावरून होणाऱ्या हिंसक घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नालासोपारा लोकलमध्ये झालेल्या हत्येच्या अवघ्या ४८ तासांनंतर माहिम रेल्वे स्थानकाबाहेर मोबाईलवरून झालेल्या वादातून ३५ वर्षीय व्यक्तीवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी अद्याप फरार आहे. (Mahim Crime)


जखमी व्यक्तीची ओळख नवीन प्रसन्ना (वय ३५) अशी असून ते माहिम पश्चिम येथील पितांबर लेन परिसरात राहतात. ते लोअर परळमधील एका जाहिरात, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करतात. (Mahim Crime)



नेमकं काय घडलं ?


गुरुवारी (२५ जून) रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास नवीन प्रसन्ना कामावरून लोकलने माहिम स्थानकात उतरले. स्टेशनबाहेरील पदपथावरून घरी जात असताना त्यांची एका अनोळखी व्यक्तीशी धडक झाली. धडकेमुळे त्या व्यक्तीचा मोबाईल खाली पडून खराब झाल्याचा दावा त्याने केला आणि नवीन यांच्याकडे मोबाईलची नुकसानभरपाई मागितली. मात्र नवीन यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात खिशातून चाकू काढत त्यांच्यावर सपासप वार केले. पोटावर गंभीर जखमा झाल्याने नवीन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना सायन रुग्णालयात दाखल केले. (Mahim Crime)


नवीन यांचे भाऊ सचिन प्रसन्ना यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर त्यांचा भाऊ जवळपास १५ तास बेशुद्ध अवस्थेत होता. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. (Mahim Crime)


दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आरोपी रेल्वेने फरार झाल्याचा संशय असून तो अमली पदार्थांच्या आहारी गेलेला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Mahim Crime)



माहिम पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत खुनाचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी आणि शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Mahim Crime)


मुंबईत किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सलग दोन दिवसांत घडलेल्या अशा घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Mahim Crime)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने