Deputy Chief Minister Eknath Shinde : टीईटी पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका लावावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबई, : टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (MCOCA) कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांनी स्पष्ट केले आहे.





या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि अत्यंत कठोर चौकशी केली जाईल. दोषी कोणत्याही पदावरील असो किंवा कोणत्याही संघटित टोळीचा भाग असो, त्याला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. संबंधितांवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल.
राज्य सरकार भ्रष्टाचाराविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरणावर काम करत असून, पेपरफुटी हा प्रकार केवळ गैरव्यवहार नसून संघटित गुन्हेगारीचे स्वरूप धारण करणारा गंभीर अपराध असल्याचेही त्यांनी नमूद केले.



यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिसांच्या तत्पर आणि सतर्क कारवाईचे विशेष कौतुक केले. गुप्त माहितीच्या आधारे तातडीने छापे टाकून पोलिसांनी लाखो मेहनती आणि प्रामाणिक उमेदवारांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचवले, असे त्यांनी म्हटले.


टीईटी(TET) परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांना आश्वस्त करताना शिंदे म्हणाले की, ही परीक्षा लवकरात लवकर पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पुन्हा घेतली जाईल. कोणत्याही प्रामाणिक उमेदवाराच्या हक्कावर गदा येऊ दिली जाणार नाही.
महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त, गुणवत्तापूर्ण आणि अधिक सक्षम बनवणे हे महायुती सरकारचे ठाम ध्येय असल्याची ग्वाहीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Comments
Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या