Maharashtra Politics : शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांना उधाण; मुलावरील आरोपांमुळे भेटल्याचा रोहित पवारांचा दावा



मुंबई : ‘ऑपरेशन टायगर’नंतर महायुतीकडून ‘ऑपरेशन तुतारी’ राबवले जाणार असल्याची जोरदार चर्चा असतानाच, शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे(Bajrang Sonawane) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, ही भेट सोनावणेंच्या मुलावर झालेल्या आरोपांमुळे असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.



रोहित पवार(Rohit Pawar) म्हणाले, "विरोधकांचे खासदार फोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून विविध यंत्रणांमार्फत त्यांना टार्गेट केले जाणार आहे, हे आम्हांला ठाऊक आहे. मात्र, शरद पवार गट, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा एकही खासदार फुटणार नाही. देशात आगामी काळात होणाऱ्या ‘डेलीमिटेशन’साठी (मतदारसंघ पुनर्रचना) भाजपला आणखी ४१ खासदारांची गरज आहे, हे गणित स्पष्ट आहे; परंतु महाराष्ट्रातून त्यांना यश येणार नाही. "


बजरंग सोनवणे यांच्या या भेटीमागचे मूळ कारण सांगताना रोहित पवार म्हणाले, "सोनवणे यांच्या मुलावर सध्या काही गंभीर आरोप केले जात आहेत. राज्याचे गृहमंत्रीपद हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, तर केंद्रातील गृहमंत्रीपद अमित शहा सांभाळत आहेत. त्यामुळे आपल्या मुलावरील आरोपांच्या कायदेशीर चौकशी संदर्भात किंवा बचावासाठी सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असावी," असा तर्क त्यांनी मांडला.




शरद पवार गटाकडे किती खासदार?
सध्या संसदेत शरद पवार गटाकडे एकूण ९ खासदार आहेत. यामध्ये ८ लोकसभेचे, तर स्वतः शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत. लोकसभेच्या खासदारांमध्ये सुप्रिया सुळे (Baramti)), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर), धैर्यशील मोहिते-पाटील (माढा), अमर काळे (वर्धा), बजरंग सोनवणे (बीड), निलेश लंके (अहिल्यानगर), भास्कर भग्रे (दिंडोरी), सुरेश म्हात्रे (भिवंडी) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण