Nashik : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या 'सूर्य रथाला' नाशिकमध्ये प्रारंभ, ७ दिवस शहराच्या विविध भागात होणार जनजागृती

Nashik : देशात स्वच्छ आणि परवडणाऱ्या ऊर्जेला चालना देणाऱ्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ची (Pradhan Mantri Surya Ghar Free Electricity Scheme) माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक शहरात विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. 'सिटी एक्सलरेटर प्रोग्राम' अंतर्गत ‘नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडिया’ द्महावितरण, पीडब्ल्यूसी (PwC), शक्ती सस्टेनेबल एनर्जी फाउंडेशन आणि 'एनर्जीवा व्हेंचर्स' यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ‘सूर्य रथा’ला रोजी महावितरणचे संचालक (संचलन) धनंजय औंढेकर यांनी विद्युत भवन येथे हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.


"प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना (Pradhan Mantri Surya Ghar Free Electricity Scheme) देशासह राज्यात उच्चतम कामगिरीकडे वाटचाल करत आहे. या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्यातील नाशिकसह चार मुख्य शहरांमध्ये ‘सूर्य रथ’ उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरेल. सध्या राज्यात ६ हजारांहून अधिक वेंडर्स सक्रिय असून या योजनेमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. नागरिकांच्या शंका व प्रश्नांचे तत्काळ निवारण करण्यासाठी या योजनेचा फायदा घेण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणचे संचालक (संचलन) धनंजय औंढेकर यांनी यावेळी केले.



या प्रसंगी 'नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडिया'चे प्रसून आनंद आणि 'एनर्जीवा व्हेंचर्स'चे अभिषेक कुलश्रेष्ठ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता योगेश निकम यांनी केले. सूत्रसंचालन समीर वडजे यांनी तर आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी केले.


हा सूर्य रथ पुढील सात दिवस नाशिक शहरातील द्वारका-पाथर्डी, सातपूर, सिडको, गंगापूर आणि पंचवटी व नाशिक रोड सह शहरातील मुख्य भागांतील प्रमुख बाजारपेठा, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि निवासी वस्त्यांमध्ये फिरणार आहे. रथासोबत सौरऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ उपलब्ध असून, ग्राहक या प्रणालीसाठी पात्र असल्याची तपासणी केली जाईल.यासह सौरऊर्जा तंत्रज्ञानाचे थेट प्रदर्शन आणि योजनेची सविस्तर माहिती मोफत दिली जाणार आहे. जाईल.शासनाकडून मिळणारे अनुदान आणि कर्ज सुविधांची माहिती सुद्धा येथे मिळेल. नाशिककर नागरिकांनी या फिरत्या 'सूर्य रथा'ला भेट देऊन योजनेचा जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.



दरम्यान, या उद्घाटन प्रसंगी महावितरणचे मुख्य अभियंते सुंदर लटपटे, प्रवीण परदेशी, अधीक्षक अभियंते देवेंद्र सायनेकर, अनिल थोरात, रमेशकुमार पवार व जगदीश इंगळे यांच्यासह पीडब्ल्यूडी कन्सल्टन्स, नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडिया’, शक्ती सस्टेनेबल एनर्जी फाउंडेशन आणि 'एनर्जीवा व्हेंचर्स'चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख

Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या