NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक 



मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी १ ऑगस्टपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMP) अनिवार्य करण्यात आले आहे, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना सुरुवातीला ही अट लागू होणार असून, पुढील टप्प्यात विद्यार्थी, दिव्यांग, पुरस्कारार्थी यांच्यासह सर्व सवलतधारक प्रवाशांनाही हे कार्ड बंधनकारक केले जाणार आहे.




एसटी महामंडळाकडून सध्या सुमारे ३५ प्रकारच्या प्रवाशांना विविध सवलती दिल्या जातात. मात्र, काही ठिकाणी खोटी ओळखपत्रे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे सवलतीचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनाच सवलत मिळावी, व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी आणि रोखविरहित व्यवस्था सक्षम व्हावी, यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डची अंमलबजावणी करण्यात आली आहे.




महामंडळाच्या माहितीनुसार, राज्यभरात आतापर्यंत ५१ लाखांहून अधिक प्रवाशांची नोंदणी पूर्ण झाली असून, त्यापैकी २५ लाख कार्ड कार्यान्वित केली आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यभरात चार हजारांहून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. निर्धारित शुल्कापेक्षा जास्त दराने कार्ड विक्री करणाऱ्या केंद्राचा परवाना रद्द करण्याचा इशाराही एसटी महामंडळाने दिला आहे.



कुठे व कसे मिळेल कार्ड ?



१ ) बसस्थानकांवरच नोंदणीची सुविधा उपलब्ध, नवीन एनसीएमसी कार्डसाठी १९९ रुपये शुल्क.
२) जुने कार्ड परत केल्यास १४९ रुपयांत नवीन कार्ड.
३) कार्डमध्ये किमान १०० रुपये शिल्लक असणे आवश्यक.
४) ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येणार.
५) ईटीआयएम मशिन, अधिकृत संकेतस्थळ, अॅप किंवा अधिकृत एजंटमार्फत रिचार्जची सुविधा उपलब्ध

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी