Thane Palghar DCC Bank : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी


शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून ‘सहकार पॅनल’चे अभिनंदन 



ठाणे : ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवल्याबद्दल शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे(Dr. Shrikant Shinde) यांनी अभिनंदन केले. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची(Co-operation Panel) निवडणुकीत सरशी झाली. सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडून आलेले संचालक ठाणे आणि पालघर जिल्ह्यात महिला, शेतकरी, बचत गट, स्वयंसहायत्ता गटांसाठी काम करतील, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहकार पॅनलचे विजयी उमेदवार तसेच बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितीज ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील उपस्थित होते.



दोन्ही जिल्ह्यातील महिला, शेतकरी, बचत गट, स्वयंसहायत्ता गटांसाठी बँक काम करेल.


सहकार पॅनलला शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किसन कथोरे, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी पाठिंबा दिला होता. निवडणुकीत सहकार पॅनलच्या उमेदवारांवर बँकेच्या सभासदांनी विश्वास दाखवला त्याबद्दल खासदार डॉ. शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. राज्यात सहकार वाढला पाहिजे, सहकारातून समृद्धी साधण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार पॅनलला मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री शिंदे निवडणुकीतील विजयी रणनीतीवर काम केले. ठाणे (thane)जिल्ह्यातल्या जागांसाठी त्यामुळे बहुतांश जागा बिनविरोध झाल्या होत्या.वसई तालुक्यात सहकार पॅनलसाठी एकहाती मतदान झाले, त्याबद्दल खासदार डॉ. शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितीज ठाकूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.



खासदारांना शिव्या देण्यापेक्षा आत्मपरिक्षण करा


शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांच्या मतदार संघात जाऊन शिव्या देण्यापेक्षा नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून का जातात, याचे आत्मपरिक्षण करा, अशी टीका शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उबाठावर केली. शिवसेना भगवा झेंडा उरावर घेऊनच पुढे चालली आहे म्हणून राज्यातील मतदारांनी २०२४ च्या निवडणुकीत शिवसेनेला भरभरुन मतदान केले आणि उबाठाला जागा दाखवली, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. त्यांना आता सकाळपासून रात्रीपर्यंत शिव्या देण्याचे काम उरले आहे, असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी लगावला.

Comments
Add Comment

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी