लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. चर्चगेट–नालासोपारा फास्ट लोकलमध्ये 22 वर्षीय मयंक लोहार याची चाकूने भोसकून हत्या झाल्यानंतर रेल्वे पोलीस दलाने स्थानकांवरील सुरक्षा अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या पाठीवरील बॅगांची हाताने तपासणी केली जाणार असून ही मोहीम सीसीटीव्ही देखरेखीखाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राबविण्यात येणार आहे.(Beed)


उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील प्रचंड गर्दीमुळे प्रत्येक प्रवाशाची बॅग स्कॅनरमधून तपासणे शक्य नसल्याने हा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. किरकोळ वादातून धारदार शस्त्रांचा वापर होण्याच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. कामगारांनी आपल्या कामासाठी वापरण्यात येणारी धारदार हत्यारे किंवा साधने रेल्वे प्रवासादरम्यान सोबत न नेता ती कामाच्या ठिकाणीच ठेवावीत, असे आवाहनही रेल्वे पोलिसांनी केले आहे. रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी बोरीवली स्थानकाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला तसेच प्रवासी संघटनांशी चर्चा करून आवश्यक उपाययोजनांबाबत सूचना दिल्या.(Beed)


या हत्येनंतर रेल्वे पोलीस प्रशासनातही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय खोपिलकर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी कल्याण रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील काही रेल्वे पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.24 जून रोजी चर्चगेट–नालासोपारा फास्ट लोकलमध्ये (Churchgate–Nalasopara Fast) दरवाजा बंद ठेवण्याच्या किरकोळ वादातून मयंक लोहार याची चाकूने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी रोशन सुवर्ण याने हल्ल्यानंतर प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत पळ काढला होता. मात्र रेल्वे पोलिसांनी त्याला कुर्ला परिसरातून अटक केली. या घटनेनंतर लोकल प्रवासातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत.दरम्यान, माहिम रेल्वे स्थानकाबाहेरही धक्काबुक्कीच्या वादातून 35 वर्षीय नवीन प्रसन्ना याच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. जखमी झालेल्या तरुणावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता