BMC News : आता तांत्रिक पाणीकपात टाळणार, महापालिकेची वतीने घेतली जाते खबरदारी

भांडुप संकुलातील विद्युत उपक्रेंद्राच्याठिकाणी उभारणार अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर


मुंबई : मुंबईत (Mumbai) सध्या निसर्गामुळे दहा टक्के आणि २० टक्के कपातीला सामारे जावे लागत असले तरी बऱ्याच वेळा विद्युत बिघाडाच्या तांत्रिक कारणांमुळे पाणीकपातीलाही सामोरे जावे लागते. त्यामुळे भविष्यात तांत्रिक कारणांमुळे पाणीकपातीचा मुंबईकरांना सामना करावा लागू नये यासाठी आता महापालिका (BMC) प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी भांडुप संकुलातील जलशुध्दीकरण प्रकल्पातून मुंबईकरांना सुरळीत पाण्याचा पुरवठा करता यावा आणि वितरण व्यवस्थेत कुठेही अडथळा निर्माण होवू नये यासाठी याठिकाणी अतिरिक्त ११० के.व्हीचे विद्युत उपकेंद्राच्या ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर (Power Transfer) उभारले जाणार आहे. त्यामुळे याची उभारणी झाल्यानंतर एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला तरी पर्यायी दुसऱ्या ट्रान्सफॉर्मर विद्युत पुरवठा करून मुंबईकरांचा पाणी पुरवठा सुरळीत राखण्याचा प्रयत्न केला जावू शकतो.


"संपुर्ण मुंबईला उर्ध्व वैतरणा, मध्य वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार व तुळशी या धरणांमधुन दैनंदिन पाणीपुरवठा होतो. संबंधित धरणांतून होणाऱ्या पाण्याचे शुध्दीकरण भांडुप संकुल, पिसे पांजरापुर संकुल, विहार व तुळशी या ठिकाणी असलेल्या जल शुध्दीकरण केंद्रामध्ये केले जातो. त्यामुळे अशा प्रकारे सुमारे ४००० दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा प्रत्येक दिवशी मुंबईला केला जातो. या ४००० दशलक्ष लिटर पाणी पुरवठयापैकी १९१०दशलक्ष लिटर पाण्याचे शुध्दीकरण भांडुप संकुल येथील जल शुध्दीकरण केंद्रात केले जाते. हे आशिया खंडातील सर्वात मोठे जल शुध्दीकरण केंद्र आहे. या व्यतिरीक्त, सन २०१४मध्ये ९०० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन अतिरिक्त जलशुध्दीकरण केंद्र, भांडुप संकुल येथे उभारण्यात आले. त्यामुळे १९१० दशलक्ष लिटर, ९१० दशलक्ष लिटर अधिक १० अतिरिक्तत क्षमता अशाप्रकारे सुमारे ३००० दशलक्ष लिटर पाण्याचे शुध्दीकरण व दैनंदिन पाणीपुरवठा भांडुप संकुल केंद्रातून केला जातो. त्यामुळे मुंबई शहराचा सुमारे ८० टक्के पाणीपुरवठा भांडुप संकुल जलशुध्दीकरण केंद्रातुन मुंबई शहरास दररोज करण्यात येत असतो.



अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भांडुप संकुल केंद्रामध्ये विद्युत पुरवठा येथील ११०के. व्ही. विद्युत उपकेंद्रामधुन होतो. हा एकमेव विद्युत स्त्रोत आहे. संबंधित ११०के.व्ही. विद्युत उपकेंद्र बाह्य उपकेंद्र यार्ड, दोन १२.५ एमव्हीए भारक्षमतेचे उच्च दाब पॉवर ट्रान्सफॉर्मर व संलग्न विद्युत परिमंडळ सुरक्षा व विद्युत उपकरणे स्थापित आहेत. या ११० के.व्ही. विद्युत उपकेंद्रास मे. टाटा पॉवर कंपनीकडुन ११० के. व्ही. कोलशेत व ११० के.व्ही. सालशेत विद्युत वाहिनी यामधुन उच्च दाब विद्युत पुरवठा केला जातो. संपुर्ण भांडुप संकुल येथील विद्युत पुरवठयाची जबाबदारी या १२.५ एमव्हीए क्षमतेच्या दोन ट्रान्सफॉर्मर मार्फत पार पाडली जाते. हे १२.५ एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर सन २०१५ उभारले होते.


या ट्रान्सफॉर्मरचे तसेच संलग्न विद्युत उपकरणांची प्रतिबंधात्मक नियमित देखभाल व निकामी बिघाड दुरुस्ती करताना संबंधित ट्रान्सफॉर्मर विद्युत पुरवठा यंत्रणेमधुन वेगळा केला जातो व संपुर्ण विद्युत यंत्रणा उपलब्ध असलेल्या दुस-या ट्रान्सफॉर्मरवर बदली केले जाते. अशा प्रकारच्या घटनेत एक ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास उपलब्ध दुस-या ट्रान्सफॉर्मरवर संपुर्ण भांडुप संकुल केंद्राचा विद्युत पुरवठा करण्याची जबाबदारी पडते. परिणामी, मुंबई शहराच्या एकंदरीत ८० टक्के पाणीपुरवठयाची जबाबदारी दुस-या ट्रान्सफॉर्मरवर पडते. अशा प्रकारच्या प्रसंगात दुस-या ट्रान्सफॉर्मरमध्येही बिघाड उत्पन्न झाल्यास संपुर्ण भांडुप संकुल येथील पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता असते. परिणामी, भांडुप संकुल येथील पाणीपुरवठा यंत्रणा, जल वाहिन्यांना मोठ्या प्रमाणात हानी निर्माण होऊ शकते व संपुर्ण मुंबई शहराचा ७५ते ८० टक्के पाणीपुरवठा खंडीत होऊ शकतो,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.



अशाप्रकारे ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यास ४ ते ६ महिन्यांचा कालावधी लागतो व उच्च विद्युत दाबाच्या नवीन ट्रान्सफॉर्मरचा पुरवठा करण्याकरीता ८ ते १०महिन्यांचा कालावधी लागु शकतो. अशा प्रकारची घटना पिसे जलशुध्दीकरण केंद्रामध्ये फेब्रुवारी २०२४मध्ये घडलेली आहे. ज्यामध्ये, एक ट्रान्सफॉर्मर बिघाड दुरुस्तीकरीता गेला असता उपलब्ध असलेल्या दुस-या ट्रान्सफॉर्मरला आग लागुन सुमारे महिन्याभरासाठी मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्यात सुमारे १०ते १५ टक्के कपात करण्यात आली होती.अशाप्रकारची अघटीत घटना मुंबई शहराच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीला हानी पोहोचवू शकते व इतक्या मोठ्या लोकसंख्येला गैरसोय निर्माण करु शकते.


त्यामुळे भांडुप संकुल येथून होणा-या सुमारे ८० टक्के पाणीपुरवठयाचा विचार करता विद्युत पुरवठा अखंडीत व सुरळीत पार पाडण्यासाठी अत्यंतिक खबरदारी घेणे गरजेचे असते. म्हणून अशाप्रकारची घटना टाळण्यासाठी व मुंबई शहराची गरज व प्रतिष्ठा टिकविण्यासाठी, ११० के.व्ही. विद्युत उपकेंद्र (भांडुप संकुल) येथे पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि संबंधित स्विच गिअरसह आदींची उभारणी केली जाणार आहे. यासाठी १४.६७ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असुन याकरता मॅक इन्व्हायरोटेक अॅन्ड सोल्युशन्स (इंडिया) प्रा.लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे .

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने