TET Exam Paper Leak : विधानसभेत 'टीईटी'च्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग

मुंबई : नीट, टीईटी यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असल्याने राज्याची देशभर बदनामी होत असून, लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, असा आरोप विरोधकांनी सोमवारी विधानसभेचे कामकाज सुरू होताच केला. यावेळी स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्याने विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालत सभात्याग केला. दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी 'एसआयटी'ची घोषणा केली असून, टीईटी पेपरफुटीप्रकरणी लवकरच सविस्तर निवेदन सादर करणार असल्याने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आश्वस्त केले. (TET Exam Paper Leak)



विधानसभेचे आजचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी स्थगन मांडण्याची विनंती केली. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, लाखो विद्यार्थी आणि शिक्षक वर्षानुवर्षे मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करतात. मात्र, पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या कष्टांवर पाणी फिरत आहे. परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यात सरकार वारंवार अपयशी का ठरत आहे, याचे उत्तर सरकारने महाराष्ट्राला द्यावे. टीईटी पेपरफुटीप्रकरणातील धागेदोरे, पेपर तयार करणाऱ्या संस्था, संबंधित कंपन्या आणि या प्रकरणामागील संपूर्ण साखळीची सखोल चौकशी करावी. तीन आरोपींना अटक झाली असली, तरी त्यांचे दुसऱ्या राज्यांशी असलेले संबंधही समोर येत आहेत. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होणे आवश्यक आहे. (TET Exam Paper Leak)



२०१८ मधील टीईटीघोटाळ्यातील आरोपी अभिषेक सावरीकर याचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले की, घोटाळ्यात आरोपी असलेल्या व्यक्तींना नंतर भाजपमध्ये सन्मानाने प्रवेश मिळाला. क्रिस्टलचे नाव कुठून येत आहे? सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हे सरकारपुरस्कृत घोटाळे आहेत का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून या गंभीर विषयावर विधिमंडळात सविस्तर चर्चा व्हावी. सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती ठोस पावले उचलणार आहे, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी स्थगन नाकारल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. (TET Exam Paper Leak)

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर