Mumbai Rain : हवामान विभागाचा 'रेड अलर्ट', मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी आगामी पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार, पुढील काही दिवस मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहणार आहेत.


पालघर जिल्ह्यात २९ जून रोजी 'अत्यंत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर १ ते ३ जुलै दरम्यानही येथे जोरदार पावसाचा अंदाज आहे. ठाणे आणि मुंबईमध्ये सोमवरपासून पुढील ५ दिवस 'मुसळधार ते अतिमुसळधार' पावसाची शक्यता आहे. यासोबतच विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. रायगड जिल्ह्यातही ५ दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, २ जुलै रोजी काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता असून, नागरिकांनी प्रवास करताना आणि घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार असल्याने प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय योजले जात आहेत.


लातूरकरांना दिलासा : लातूर जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी १३.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रेणापूर तालुक्यात सर्वाधिक २९.७ मिलीमीटर, तर देवणी तालुक्यात सर्वात कमी १.२ मिलीमीटर पाऊस झाला. लातूरमध्ये २१.७, चाकूरमध्ये २१.०, उदगीरमध्ये १६.२, जळकोटमध्ये १५.७, अहमदपूरमध्ये १४.४, शिरूर अनंतपाळमध्ये १३.३, औसामध्ये ६.० आणि निलंग्यात १.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अनेक भागांत अद्याप पेरणीयोग्य दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.



पंढरपुरातही दमदार हजेरी : पंढरपूर तालुक्यातील चळे आंबे ओझेवाडी या परिसरात पहाटेपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे नदीकाठच्या परिसरातील अनेक ओढ्या नदी नाले वाहू लागले असून अनेक शेतांमधून देखील आता पाणी उभारायला सुरुवात झाली आहे. पहिल्याच पावसात शेत शिवार सह सर्वत्र पाणी वाहू लागल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळालेला दिसून येतो.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा