Ghatkopar : घाटकोपर परिसरातील पदपथांवरील ४ अनधिकृत दुकाने आणि ३ वाचनालयांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर येथील पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या ४ अनधिकृत दुकानांचे आणि ३ वाचनालयांवर मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागाकडून मंगळवारी ३० जून २०२६ रोजी कारवाई करण्यात आली.



संत ज्ञानेश्वर रोड , पंत नगर, घाटकोपर पूर्व येथील रस्त्यावरील आणि पदपथावरील या अनधिकृत दुकाने व वाचनालयांमुळे पादचाऱ्यांना मार्गक्रमण करण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार, मंगळवारी येथील ४ अनधिकृत दुकानांचे आणि ३ वाचनालयांचे निष्कासन करण्यात आले. तसेच, अनधिकृतपणे उभारलेले शेड आणि बांधकाम तोडण्यात आल्या. या कारवाईमुळे, परिसरातील पदपथ मोकळा झाला असून पादचाऱ्यांना मार्गक्रमण करणे सोयीचे झाले आहे. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या निर्देशांनुसार, उपआयुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (एन विभाग) मारुती पवार यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. ‘एन’ प्रशासकीय विभाग अंतर्गत विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी विविध संयंत्रांच्या सहाय्याने ही कारवाई केली. घाटकोपर पोलीस ठाण्याकडून यावेळी पुरेसा बंदोबस्त तैनात होता.



Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा