Mumbai Rain : पावसाचा तडाखा, उपनगरातील काही भागांमध्ये साचले पाणी, पण त्वरीत झाला निचरा

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईला रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळून मुंबईतील मुलुंड,भांडुप, घाटकोपर,मालाड तसेच अंधेरी आदी भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडले. मात्र, मध्यरात्रीपासून हजेरी असल्यामुळे सकाळी सकाळी ठिकठिकाणी असलेल्या पाण्याचा निचरा योग्यप्रकारे झाला. यासाठी पंपा चालवण्यात आले. त्यामुळे मुसळधार पाऊस पडून पाणी साचल्यानंतरही कोणताही परिणाम मुंबईच्या कारभारावर दिसून आला नाही. (Mumbai Rain)


मुंबईत सोमवारी कुलाबा वेधशाळेच्या नोंदीनुसार ३०.४मि.मी आणि सांताक्रुझ वेधशाळेच्या नोंदीनुार १०३ मि.मी एवढा पाऊस पडला गेला आहे. आतापर्यंत संपूर्ण मुंबईतील शहर भागांमध्ये ४०९ मि.मी आणि उपनगरांत ३८८ मि.मी एवढा एकूण पाऊस झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत शहरांत २७.९३ टक्के आणि उपनगरांत २२.०१ टक्के एवढा पाऊस पडला आहे. (Mumbai Rain)


शहर : ३७.५० मि.मी


पूर्व उपनगरे : ११३.२७ मि.मी


पश्चिम उपनगरे : ८४.२७ मि.मी (Mumbai Rain)



कोणत्या भागात रविवारी मध्यरात्रीपासून साचले होते पाणी :


पूर्व उपनगरात मुलुंड, भांडुप, घाटकोपर, पश्चिम उपनगरांत मालाड पूर्व, मालाड पश्चिम मालवणी, अंधेरी पश्चिम.. या भागांमध्ये पाणी साचण्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. (Mumbai Rain)



मंगळवारी भरती आहोटीची स्थिती :


भरती : दुपारी १२़ ३५ ( ४.१६ मीटर)


ओहोटी : सायंकाळी ६.४४ वा.(२.०१ मीटर)


हवामानाचा अंदाज : कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार मुंबई शहर आण उपनगरांत आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Mumbai Rain)



तब्बल १६ ठिकाणी शॉर्टसर्कींट :


मध्यरात्रीपासून पडलेल्या पावसामुळे शहरात ०९ ठिकाणी तर पूर्व उपनगरात ०२ आणि पश्चिम उपनगरात ०५ अशाप्रकारे एकूण १६ ठिकाणी शॉर्टसर्कीटच्या घटना घडल्या गेल्या. तर मुंबईल एकूण ३७ ठिकाण झाडांच्या फांद्या तुटून पडणे तथा उन्मळून पडण्याच्या घडल्या. यामध्ये शहरात पाच, पूर्व उपनगरांत १२ आणि पश्चिम उपनगरांत १७ ठिकाणी अशाप्रकारे झाडे पडून दुघर्टना घडल्या. (Mumbai Rain)



सर्वांधिक पाऊस कोणत्या भागांमध्ये :


वडाळा,माटुंगा: ६१ मि.मी


शीव रावळी कॅम्प : ५३ मि.मी


मलबार हिल : ४५ मि.मी


भायखळा : ४३ मि.मी


मुलुंड विणा नगर : २१० मि.मी


मुलुंड गवाणपाडा : १६७ मि.मी


मुुलुंड गुरु गोविंद मार्ग : १६४ मि.मी


मुलुंड मिठानगर : १५८ मि.मी


मुलुंड : १५७ मि.मी


वर्सोवा : १६७ मि.मी


गोरेगाव : १२९ मि.मी


वर्सोवा पंपिंग स्टेशन : १२७ मि.मी


ओशिवरा नगर प्रतीक्षा नगर : १२४ मि.मी


मरोळ : १२२ मि.मी

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.