Under-19 Rowing Championship : पिंपरी-चिंचवडमध्ये होणार रोईंग वर्ल्ड कप; स्पर्धेसाठी १० कोटींच्या आर्थिक मदतीची मागणी

रोईंग वर्ल्ड कप अंडर-19, अंडर-23 स्पर्धा पिंपरीत; सुनेत्रा पवार यांच्याकडे आर्थिक सहाय्याची मागणी


मुंबई : रोईंग वर्ल्ड कप–III स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळाल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड येथे रोईंग वर्ल्ड कप अंडर-१९ आणि अंडर-२३ आशियाई स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी राज्य शासनाकडून १० कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्याची मागणी करण्यात आली आहे.



महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले.



ही स्पर्धा पिंपरी-चिंचवडमधील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME) परिसरातील आर्मी रोईंग नोड येथे होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, तांत्रिक उपकरणे, सुरक्षा, खेळाडूंची निवास व्यवस्था, वाहतूक आणि इतर आवश्यक कामांसाठी सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.



यावेळी स्वित्झर्लंडमधील ल्युसर्न येथे झालेल्या रोईंग वर्ल्ड कप–III स्पर्धेत लाईटवेट मेन्स डबल स्कल्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारे लक्ष आणि उज्वल कुमार सिंह यांचा सुनेत्रा पवार आणि अण्णा बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, या दोन्ही खेळाडूंनी पिंपरीतील आर्मी रोईंग नोड येथे सराव करून जागतिक स्तरावर यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी शहरासाठीही अभिमानाची बाब आहे.


खेळाडूंनीही आपल्या प्रशिक्षणाचा अनुभव आणि आगामी स्पर्धांसाठी सुरू असलेल्या तयारीची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिली. राज्य शासनाचे सहकार्य मिळाल्यास पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात नवी ओळख मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


Comments
Add Comment

Amrit Bharat Express: मुंबई ते अयोध्या 11 जनरल डब्यांसह अमृत भारत एक्स्प्रेस… महाराष्ट्रात कुठे कुठे असेल थांबा?

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा या सणानिमित्त मुंबईहून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवासी जात असतात. दरवर्षीची

FDA Action: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही FDA ची धडक कारवाई, रिलायन्स स्टोरेज आणि ब्लिंकिटच्या कोल्ड स्टोरेजवर धाड सत्र

महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह इतरत्र जिल्ह्यामध्ये अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाई करत लाखोंचा

Nashik Maha Goda Aarti: रामकुंडावर 31 ऑक्टोबरला केली जाणार ‘महा गोदा आरती’, नाशिक जिल्ह्यातील गावकरी घेणार सहभाग

नाशिक: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येत्या 31 ऑक्टोबर 2026 रोजी ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य शुभारंभ केला

Beed Accident : तुळजापूरला चाललेल्या भाविकांवर काळाचा घाला; पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात

बीड जिल्ह्यातील पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी

Nashik Accident News: भीषण अपघात! भरधाव कारची पोलिसांसह भाविकांना जोरदार धडक; पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News: नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी येथे रविवारी, 18 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री

Ketan Agrawal murder case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

पुणे: पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष