पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा; सहप्रवाशांना जीवे मारण्याच्या धमक्या

पनवेल : पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या लोकलमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका प्रवाशाने धिंगाणा घालत सहप्रवाशांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीने, "मी चार खून केले आहेत, पुढचा नंबर तुझा आहे," अशी धमकी दिल्याने काही काळ डब्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले.



प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सुरुवातीला प्रवाशांनी संबंधित व्यक्तीकडे दुर्लक्ष केले. मात्र, तो अधिकच आक्रमक होत अश्लील शिवीगाळ करू लागला आणि प्रवाशांना धमकावू लागल्याने डब्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. सामूहिक हस्तक्षेपामुळे संभाव्य अनर्थ टळला.



या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काही प्रवाशांनी मोबाईलवर चित्रीत केला असून तो सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, संबंधित व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे की नाही किंवा त्याच्याविरोधात कोणती कारवाई करण्यात आली आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.



काही दिवसांपूर्वी बोरिवली लोकलमध्ये प्रवाशाच्या हत्येची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकारामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करत असल्याने रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि रेल्वे पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.मद्यधुंद आणि उपद्रवी प्रवाशांविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याबरोबरच लोकलमधील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास