Mumbai Rains Traffic : मुंबईकरांनो सावधान! मुसळधार पावसाने शहर ठप्प; वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतुकीलाही बसू लागला आहे. पश्चिम उपनगरात पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. (Mumbai Rains Traffic)


सर्वाधिक परिणाम पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western Express Highway) दिसून येत आहे. बोरिवलीहून वांद्र्याकडे जाणाऱ्या मार्गावर मालाड ते सांताक्रुझदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. नेहमी अवघ्या ३० मिनिटांत पूर्ण होणारा प्रवास आता तब्बल दीड तासांहून अधिक वेळ घेत आहे, त्यामुळे कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. (Mumbai Rains Traffic)



मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले आणि सांताक्रुझ या परिसरात महामार्गावर वाहनांची संथ गती कायम असून, चारचाकी, बस आणि मालवाहू वाहनांच्या रांगा अनेक किलोमीटरपर्यंत पसरल्याचे चित्र आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रमुख चौकांवर अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, वाहनांची कोंडी कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात येत आहे. (Mumbai Rains Traffic)


पश्चिम उपनगरात काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. वांद्रे, सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सखल भागांमध्ये पुन्हा पाणी साचण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Mumbai Rains Traffic)



प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळण्याचे, तसेच प्रवास करण्यापूर्वी वाहतूक आणि हवामानाची माहिती तपासूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने