Chembur Tree Collapse : झाड दुघर्टनाप्रकरणी संबंधित निष्काळजीपणा करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन

संबंधित कंत्राटदारावरही महानगरपालिका करणार कठोर कारवाई


मुंबई : चेंबूर पश्चिम परिसरातील डायमंड गार्डनजवळ शाळेच्या बसवर पिंपळ प्रजातीचा वृक्ष मुळासकट उन्मळून पडल्याने झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई महागनरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे, उप आयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे यांची समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त भिडे यांनी दिले आहेत. यासोबतच समितीने या प्रकरणात तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा,असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान प्रथमदर्शनी निष्काळजीपणा निदर्शनास आलेल्या एम पश्चिम विभागाचे सहायक उद्यान अधिक्षक जगदीश भोईर, सहायक अभियंता योगेश पार्ते, दुय्यम अभियंता अरुण मुंढे यांना याप्रकरणी निलंबीत करण्यात आले आहे. यासह संबंधित कंत्राटदाराविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.


या घटनेची गंभीर दखल महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी घेतली आहे. तसेच घटनेच्या सखोल चौकशीसाठी चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीने आपला अहवाल आठ दिवसांत सादर करावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. नेमण्यात आलेल्या समितीने या प्रकरणात तज्ञांराचा सल्ला घ्यावा. तसेच मुंबईमध्ये (Mumbai) अशा घडना वारंवार घडू नये यासाठी शिफारशी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यापुढे चेंबूर (Chembur) दुर्घटनेसारखी घटना घडू नये यासाठी महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी धोकादायक झाडांची नव्याने छाटणी आणि कालबद्ध पुनर्परिक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. धोकादायक ठरणाऱ्या वृक्षांच्या छाटनीबाबत तसेच सुस्थितीतीबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देशही महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत.



जानेवारी महिन्यात सहायक आयुक्तांनी तपासणीच्या केल्या होत्या सूचना


उन्मळून पडलेला पिंपळ वृक्ष ६० ते ७० वर्ष जुना होता. संबंधित वृक्षाबाबत यापूर्वी कोणतीही अधिकृत सार्वजनिक तक्रार प्राप्त आलेली नव्हती. तथापी, जानेवारी २०२६ मध्ये परिसरातील रस्त्याच्या कडेला कामांच्या अनुषंगाने तपासणी करून आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना एम पश्चिम विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांनी दिल्या होत्या. तत्पूर्वी पडलेल्या वृक्षाचे सर्वेक्षण १२ मे २०२६ रोजी पूर्ण करण्यात आले होते. बाह्य निरीक्षणानुसार सदर वृक्ष सुस्थितीत व मजबूत असल्याचे निदर्शनास आले होते. तथापि, पावसाळयापूर्वी प्रचलित पध्दतीनुसार २९ मे २०२६ रोजी या वृक्षाची छाटणीही करण्यात आली होती. त्यावेळी झाड सुरक्षित अवस्थेत असल्याचे आढळले.



या वर्षांत ४६८ मृत झाडे कापली, १ लाख झाडांच्या फांद्या छाटल्या


पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) उद्यान विभागाकडून खबरदारी घेत दरवर्षी वृक्ष छाटणी करण्यात येते. सन २०२६ मध्ये अशाप्रकारे ४६८ झाडे ही मृत आणि धोकादायक आढळून आली. ही सर्व झाडे काढून टाकण्यात आली. यासोबत १ लाख ३१८ झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या. याशिवाय विविध कारणांनी देखील महानगरपालिका क्षेत्रात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडतात.



मागील तीन वर्षांतील उन्मळून पडलेल्या झाडांची संख्या


सन २०२३ : ६८७ (महापालिका हद्द १८० आणि खासगी क्षेत्रात ५०७)


सन २०२४ : ६५३ (महापालिका हद्द १७१ आणि खासगी क्षेत्रात ४८२)


सन २०२५ : ८५५(महापालिका हद्द २२१ आणि खासगी क्षेत्रात ६३४ )

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने