Chandrakant-dada Patil : पॉलीटेक्निक प्रवेशासाठी अर्ज करण्यास ६ जुलैपर्यंत मुदतवाढ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थीहिताच्या निर्णय

मुंबई  : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील(Chandrakant Patil) यांनी विद्यार्थीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (Polytechnic) अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून दि. ६ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.



प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २ जुलै २०२६ होती. अंतिम मुदतीपर्यंत राज्यभरातून १ लाख ६१ हजार ७८६ उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, त्यापैकी १ लाख ३२ हजार ९९६ विद्यार्थ्यांनी आवश्यक शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केले आहेत. प्रवेश प्रक्रियेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अंतिम मुदतीनंतरही अनेक विद्यार्थ्यांकडून मुदतवाढीची होत असलेली मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाइन अर्ज भरणे, शुल्क भरणे किंवा तांत्रिक अडचणींमुळे निर्धारित मुदतीत अर्ज पूर्ण करता आला नव्हता. अशा विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून अर्ज भरण्यासाठी ही अखेरची संधी उपलब्ध करून दिली आहे.



राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसह राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण अधिक विद्यार्थी-केंद्रित, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रवेश प्रक्रियेत कोणताही पात्र विद्यार्थी केवळ मुदतीअभावी वंचित राहू नये, हा शासनाचा स्पष्ट दृष्टिकोन असून त्याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.


इच्छुक विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेत दि. ६ जुलै २०२६ पर्यंत आपला अर्ज निश्चित करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या कॅप फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक, प्रवेश नियमावली, आवश्यक कागदपत्रांची माहिती तसेच ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज निश्चित करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा