Sakinaka Manhole Accident : साकीनाका मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी चार अधिकाऱ्यांचे निलंबन

- विधानसभेत नगरविकास राज्यमंत्र्यांचे निवेदन; मृताच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत, उच्च स्तरीय समिती गठीत



मुंबई : मुंबईतील साकीनाका भागात गुरुवारी मॅनहोलमध्ये पडून एका ५५ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणी प्रशासकीय हलगर्जीपणाचा ठपका ठेवत मुंबई महानगरपालिकेच्या 'एल' विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्यासह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसापेक्ष निलंबित करण्यात आले आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी गुरुवारी सायंकाळी या दुर्घटनेबाबत विधानसभेत निवेदन केले. तसेच, सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश देण्यात आले असून, मृत अस्लम इसाक शेख यांच्या कुटुंबीयांना महानगरपालिकेच्या वतीने १० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्र्यांनी दिली. (Sakinaka Manhole Accident)



भाजप आमदार अमित साटम यांनी 'पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन'च्या माध्यमातून साकीनाका खैराणी रोड येथील या दुर्घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. साकिनाका येथील यादव नगरमध्ये राहणारे अस्लम शेख हे मॅनहोलमध्ये पडल्याचे सांगत साटम यांनी दोषी कंत्राटदारावर तातडीने एफआयआर नोंदवण्याची आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. या घटनेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईत पावसाळ्यात जागोजागी गटारे उघडी ठेवली जातात, त्यामुळे काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध डॉक्टर अमरापूरकर यांचा असाच दुर्दैवी अंत झाला होता, अशी आठवण अध्यक्षांनी करून दिली. त्यामुळे या प्रकरणात केवळ निलंबन करून चालणार नाही, तर अशा निष्काळजी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा (कल्पेबल होमिसाईड) गुन्हा दाखल व्हायला हवा, असे सांगत अध्यक्षांनी सरकारला सभागृहाचे कामकाज संपण्याच्या आत यावर निवेदन करण्याचे आदेश दिले होते. (Officer Suspension)


अध्यक्षांच्या निर्देशानंतर नगरविकास राज्यमंत्र्यांनी सभागृहात सादर केलेल्या निवेदनानुसार, कुर्ला साकीनाका येथील खैरानी मार्गालगत मलनिस्सारण प्रचालन खात्यामार्फत मॅनहॉलवर 'संरक्षक जाळी' बसवण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना कंत्राटदाराने सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्यावेळी तिथून मोबाईलवर बोलत पायी जात असलेले अस्लम शेख मॅनहॉलजवळ आले असता, तिथे काम करणाऱ्यांनी त्यांना आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा तोल जाऊन ते मॅनहॉलमध्ये पडले. अग्निशमन दल आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.






सात दिवसांत अहवाल द्या!



या घटनेची गंभीर दखल घेत सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर, सहायक अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजीत चौगुले आणि सहायक अभियंता उत्तम पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले असून, मृताच्या वारसांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे. मुंबईत अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि या दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, उपआयुक्त (सामान्य प्रशासन), उपआयुक्त (परिमंडळ ७) आणि उपआयुक्त (पायाभूत सुविधा) यांचा समावेश असलेली ही समिती सात दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने