ST NCMC Card : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा जबरदस्त प्रतिसाद; ६२.८६ लाखांनी केली नोंदणी

- १ ऑगस्टपासून मोठा बदल


मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ६२ लाख ८६ हजार ७६५ प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ३५ लाख ५२ हजार ३३२ कार्डे सक्रिय करण्यात आली आहेत, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यभरात डिजिटल प्रवास व्यवस्थेला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. (ST NCMC Card)



१ ऑगस्टपासून 'या' प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य :


परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेत १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रवर्गातील ज्या प्रवाशांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी उर्वरित कालावधीत अधिकृत नोंदणी केंद्रांवर जाऊन स्मार्ट कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. (ST NCMC Card)



छत्रपती संभाजीनगर प्रदेश अव्वल :


NCMC प्रकल्पाच्या अंमलबजावणीत छत्रपती संभाजीनगर प्रदेशाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या प्रदेशात १५ लाख ९३ हजार २५६ प्रवाशांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ८ लाख ८६ हजार ४७३ कार्डे सक्रिय करण्यात आली आहेत. यानंतर, पुणे प्रदेश – १४ लाख ७१ हजार ४३६ नोंदण्या; नाशिक प्रदेश – १४ लाख ३८ हजार ६९ नोंदण्या अशी उल्लेखनीय कामगिरी नोंदवण्यात आली आहे. (ST NCMC Card)



विभागनिहाय जळगाव आघाडीवर :


विभागनिहाय आकडेवारीनुसार जळगाव विभाग सर्वाधिक ४ लाख ६३ हजार २३० नोंदणींसह अव्वल ठरला आहे. त्यानंतर अहिल्यानगर (३.९५ लाख), सातारा (३.४८ लाख), सोलापूर (३.४२ लाख), बुलढाणा (३.३१ लाख) आणि बीड (३.२७ लाख) या विभागांनीही उल्लेखनीय प्रगती केली आहे. (ST NCMC Card)



'वन नेशन, वन कार्ड' संकल्पनेला चालना :


एसटी महामंडळाने डिजिटल तिकीट प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी आणि 'वन नेशन, वन कार्ड' ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी NCMC प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. आगामी काळात नोंदणी केलेल्या उर्वरित प्रवाशांची कार्डे जलदगतीने सक्रिय करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक पात्र प्रवाशापर्यंत NCMC स्मार्ट कार्ड पोहोचवण्याचा एसटी महामंडळाचा निर्धार असून, डिजिटल आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. (ST NCMC Card)

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म