Mumbai Rain : मुंबईत पाऊस सुरूच! सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार, ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई : मुंबईत (Mumbai) सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर कायम असून अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department - IMD) आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert), तर रायगडसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे.



पुढील ७२ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ७२ तासांत मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः मुंबईतील काही भागांमध्ये पुढील २४ तासांत २०० मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



मुंबईत पहाटेपासून संततधार


मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ आणि वांद्रे परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली असून सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही ठिकाणी लोकल (Local) रेल्वे सेवेलाही विलंब होत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे.



नागरिकांना सतर्कतेचे आवाहन


प्रशासन आणि हवामान विभागाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच सखल भाग, नदी-नाले आणि समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे.



आजही ऑरेंज अलर्ट (Orange Alert)


मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत आजही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील अनेक भागांत ७ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.



२ ते ३ जुलैदरम्यान (सकाळी ५ ते ६) झालेली पावसाची नोंद


मलबार हिल – १४६ मिमी


फोर्ट – १३९ मिमी


अंधेरी – १३६ मिमी


वर्सोवा – १२९ मिमी


पवई – १२४ मिमी


मानखुर्द – ११८ मिमी


भांडुप – ११६ मिमी


मुलुंड – ११५ मिमी

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने