Kurla Manhole : जाळी बसवण्याच्या कामावेळीच कुर्ल्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून पादचाऱ्याचा मृत्यू

सहायक आयुक्तांसह चार जणांना केले निलंबित


सात दिवसात अहवाल सादर करण्याचे समितीला निर्देश


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रचालन खात्यामार्फत गुरुवारी २ जुलै २०२६ दुपारी कुर्ला साकीनाका येथील खैरानी मार्गालगत मनुष्य प्रवेशिकेवर (मॅनहोलवर) ‘संरक्षक जाळी' बसविण्याची कार्यवाही सुरू असताना एका व्यक्तीचा संबंधित मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. अस्लम शेख (५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, या मॅनहोलच्या दुघर्टनेप्रकरणी सकृत दर्शनी दोषी दिसून येत असलेल्या ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्यासह सहायक/दुय्यम अभियंता (परिरक्षण, एल विभाग) दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता (परिरक्षण, एल विभाग) अभिजीत चौगुले, सहायक अभियंता (मलनिस्सारण प्रचालन) उत्तम पाटील यांना चौकशीसापेक्ष निलंबित करण्यात आले. तसेच, सुरक्षेच्या नियमांबाबत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.



मुंबईतील 'एल' विभाग परिसरात कुर्ला साकीनाका येथील खैरानी मार्गालगत मलनिस्सारण प्रचालन खात्यामार्फत 'मनुष्य प्रवेशिकेवर (मॅनहोल) संरक्षक जाळी' बसवण्याची कार्यवाही सुरू होती. यासाठी संबंधित कंत्राटदाराने मॅनहोलचे झाकण उघडले. यावेळी कंत्राटदाराचा माणूस बाजुला उभाही होता. या मॅनहोल्समध्ये मनुष्य दुघर्टना होवू नये यासाठी जाळी बसवण्याची कार्यवाही सुरू असताना कंत्राटदर कंपनीच्यावतीने योग्य ती सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेत घेतली नसल्याचे शकृत दर्शनी दिसून आले. त्यावेळी रस्त्यावरून अस्लम इसाक शेख (वय ५५ वर्षे) हे मोबाईलवर बोलत पायी जात होते. त्यावेळी शेख हे थेट मोबाईलवर बोलता बोलताच मॅनहोलमध्ये पडले. ज्यावेळेला शेख मॅनहोलजवळ येत होते त्यावेळी कंत्राटदाराच्या माणसाचा त्याकडे लक्ष नव्हता. मात्र, दुर्दैवाने शेख यांचा तोल जाऊन ते 'मॅनहोल' मध्ये पडले. मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्यात, दुर्दैवाने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.



चार अधिकाऱ्यांना तात्काळ केले निलंबित


या घटनेची गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, एल विभागाच सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर, सहायक/दुय्यम अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजीत चौगुले, सहायक अभियंता उत्तम पाटील यांना चौकशीसापेक्ष निलंबित करण्यात आले आहे. तसेच सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.



मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य


या दुर्दैवी घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने १० लाख रुपयांचे अर्थयहाय्य करण्याचे माननीय महापौर श्रीमती रितू तावडे यांनी जाहीर केले आहे.


उच्चस्तरीय चौकशीची नेमणूक, सात दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश...


सदर घटना कशामुळे घडली, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अशी घटना पुन्हा घडू यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीत उपआयुक्त (सामान्य प्रशासन), उपआयुक्त (परिमंडळ ७), उपआयुक्त (पायाभूत सुविधा) सदस्य आहेत. याचौकशी समिती सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


पुढीत सात दिवसांमध्ये विशेष तपासणी मोहिम


अशाप्रकारची दुर्देवी घटना भविष्यात घटना घडू नये, या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मनुष्य प्रवेशिकेची कामे करताना चारही बाजूंनी सुरक्षारोधक (बॅरेकेट्स) लावण्याचे निर्देश पुन्हा एकदा देण्यात आले आहेत. तसेच, पुढील सात दिवसात मुंबईतील सर्व मॅनहोलची १०० टक्के पाहणी करावी. त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करावी. त्याबाबतचा अहवाल तयार करण्याचे निर्देश सर्व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सातही परिमंडळाचे उपआयुक्त, २६ प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त यांना देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक