Ashish Shelar : लैंगिक जाहिरातींवर बंधने येणार

कायद्यात सुधारणा करण्याचे मंत्री आशिष शेलार यांचे विधानसभेत आश्वासन; तज्ज्ञ समिती स्थापन करणार


मुंबई (Mumbai): महिलांचे असभ्य चित्रण करणाऱ्या, अश्लीलतेला खतपाणी घालणाऱ्या आणि लैंगिक अपराधास प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती, होर्डिंग्ज, तसेच संकेतस्थळे व समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह मजकुराला चाप लावण्यासाठी राज्य सरकार विद्यमान कायद्यांतील दंडात्मक तरतुदी अधिक कठोर करणार आहे. "या संदर्भातील जुन्या कायद्यांमधील दंडाची रक्कम आजच्या काळात अत्यंत तोकडी असल्याने, त्यात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधला जाईल. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवून महिलांच्या सन्मानाचे रक्षण करणारे संतुलित धोरण तयार करण्यासाठी एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात येईल," अशी घोषणा सामान्य प्रशासन प्रभारी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.



भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अशासकीय विधेयकाला उत्तर देताना ते बोलत होते. मुनगंटीवार यांनी लैंगिक गुन्ह्यांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती, फलक आणि डिजिटल माध्यमांवरील अशा मजकुरावर कायद्यानेच पूर्ण बंदी घालण्याची मागणी करणारे अशासकीय विधेयक मांडले होते. त्यावर सरकारची भूमिका मांडताना मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, महिलांचे असभ्य चित्रण आणि लैंगिक गुन्ह्यांना प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींविरोधात सरकारचे धोरण शून्य सहनशीलतेचे (झिरो टॉलरन्स) आहे. सार्वजनिक माध्यमांतून अशा प्रकारची भाषा, चित्रे किंवा हावभाव प्रसारित करणाऱ्यांवर संविधान आणि कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.



मंत्र्यांनी पुढे सांगितले की, भारतीय न्याय संहिता, स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम, केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यान्वये इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर आधीपासूनच कारावास व दंडाच्या तरतुदी आहेत. "मात्र, १९८६ आणि १९९४ मधील कायद्यांतील दंडाची रक्कम आजच्या आर्थिक परिस्थितीत अतिशय किरकोळ ठरत असल्याने गुन्हेगारांवर त्याचा धाक उरलेला नाही. त्यामुळे स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण कायदा १९८६ आणि केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम १९९४ मधील दंडात्मक तरतुदींचा पुनर्विचार करून दंडात मोठी वाढ करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल," असे शेलार यांनी स्पष्ट केले.

जाहिरातींतून कुसंस्कार नकोत


आशिष शेलार म्हणाले की, जाहिराती हा जरी समाजजीवनाचा आणि अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असल्या, तरी त्या समाजात सकारात्मक मूल्ये रुजविणाऱ्या असाव्यात. त्यातून कुसंस्कार किंवा लैंगिक गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळता कामा नये. समाजात चांगल्या संस्कृतीची आणि मूल्यांची जपणूक करण्यासाठी अशा प्रकारच्या अश्लील आणि महिलांचा अवमान करणाऱ्या विकृत जाहिरातींवर कायदेशीर आणि प्रभावी नियंत्रण आणणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा