PM Narendra Modi : ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, तपास यंत्रणा सतर्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.. मेलबर्नमध्ये आयोजित होणाऱ्या पंतप्रधानांच्या भव्य कम्युनिटी प्रोग्रामपूर्वी सोशल मीडियावर त्यांना जीवे मारण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. या गंभीर प्रकारानंतर ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे.


पोलिसांनी या धमकीबाबत अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नसून कोणत्याही अटकेची पुष्टी केलेली नाही. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) दौऱ्यासाठीच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस, राज्य पोलीस आणि विशेष सुरक्षा पथकांसह अनेक संस्थांच्या सहकार्याचा समावेश असेल.



ऑस्ट्रेलियातील मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेलबर्नच्या प्रसिद्ध मार्व्हल स्टेडियममध्ये 'मेलबर्न मीट्स मोदी' या भव्य भारतीय समुदाय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी फेसबुकवर करण्यात आलेल्या एका पोस्टच्या खाली ही धमकी देण्यात आली. 'अबू मुस्तफा' नावाच्या एका संशयास्पद फेसबुक अकाऊंटवरून कमेंट करण्यात आली आहे की, "एक गोष्ट लक्षात ठेवा, या कार्यक्रमादरम्यान स्टेडियमचे छप्पर बंद राहिलेलेच बरे पडेल, अन्यथा मोदी ऑस्ट्रेलियात आपल्या मृत्यूला आमंत्रण देण्यासाठी येत आहेत." ही धमकी समोर येताच कार्यक्रमाच्या आयोजकांनी आणि भारतीय दूतावासाने तातडीने हे प्रकरण ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांकडे सोपवले. (PM Narendra Modi)



धमकीचे गांभीर्य ओळखून ऑस्ट्रेलियन तपास यंत्रणांनी तातडीने सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात या सोशल मीडिया पोस्टशी संबंधित IP Address ट्रॅक करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. ही कमेंट नेमकी कुठून आणि कोणी केली, तसेच यामागे कोणत्या दहशतवादी किंवा गुन्हेगारी संघटनेचा हात आहे का, याचा कसून शोध घेतला जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या गुन्हेगारी कायद्याचे उल्लंघन झाल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (PM Narendra Modi)

Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी