Mumbai Tree Collapse Incidents : मुंबईतील झाडांच्या फांद्यांची छाटणी, तर पडझड होते कशी?

मुंबई : मुंबईत चेंबूर (Chembur) येथील झाडांच्या दुघर्टनांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत असून आतापर्यंत एक लाखांहून अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. मात्र, एवढ्या मोठ्याप्रमाणात झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली असली तरी झाडांची पडझड (Tree Collapse) होतेच कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत जून पासून तब्बल ३०० ते ४०० झाडांच्या फांद्यांची आणि झाडांची पडझड झाली आहे. त्यामुळे झाडांच्या शास्त्रोक्त कापणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


खार पश्चिम येथील लिंकींग रोडवर झाडाची दुघर्टना घडून एका मुलीचा मृत्यू तर एक मुलगी जखमी झाली. त्यानंतर चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड पडून विहान श्रीवास्तव या ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाला. तर सांताक्रुझ पश्चिम येथे झाडाची पाहणी करण्यास गेलेल्या कामगारांवर बाजुचे झाड कोसळून ८ जण जखमी झाले आहेत.



मागील जून महिन्यात १८० झाडे उन्मळून पडणे तसेच फांद्या पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर मागील तीन दिवसांमध्ये ३४९ झाडांची पड झाली. यामध्ये एका मुलाचा मृत्यू तर १२ जण जखमी झाले आहे. झाडांची पडझड ही शास्त्रोक्तपणे कापणी न झाल्यामुळे झाल्याचे बोलले जात असून मागील आठ ते दहा वर्षांमध्ये उद्यान अधिक्षक तसेच उपायुक्त(उद्यान) यांनी कोणत्याही प्रकारची नवीन तंत्रप्रणाली तसेच वृक्ष संगोपन तज्ज्ञांची नेमणूक केली नाही. वारंवार यांची मदत घेण्यासंदर्भात विविध पक्षांच्या आमदारांनी पत्र देवूनही उद्यान अधिक्षकांनी कोणतीही दखल घेतली नाही. तसेच नवीन तंत्र प्रणालीचा वापर करण्यासंदर्भात कोणताही प्रयत्न न करता जुन्याच प्रस्थापित कंत्राटदारांना कामे करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यामुळे आजही झाडांची शास्त्रोक्तपणे म्हणजे ज्या बाजुला झाडांच्या फांद्या झुकल्या जात असतील तेथील फांद्या छाटून त्यांचे बॅलेसिंग समांतर करणे हे आवश्यक असते. तसेच वरवर चांगले दिसणारे झाड आतून पोखरले असे तर ते मृत असे म्हणून काढून टाकायला हवा. पण यासाठी कुठेही उद्यान विभागाने पुढाकार घेतलेला नाही.



मुंबईतील नव्याने बनवलेल्या रस्त्यांवरील झाडांचा सर्वे करा- महापौर


मुंबईतील चेंबूर येथील दुघर्टनेनंतर नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या सर्व रस्त्यांवरील झाडांचे त्वरीत ऑडीट तथा सर्वे करण्यात यावा अशी मागणी महापौर रितू तावडे यांनी केला आहे. ही झाडे कमकुवत तर नाही याची पडताळणी व्हायला हवी,असेही त्यांनी स्पष्ट केले.


झाडांची मागील तीन दिवसातील पडझड


१ जुलै २०२६ : ४८


२ जुलै २०२६ : १८० (१ मृत, ४ जखमी)


३ जुलै २०२६ : १२१( ८ जखमी)


झाडांच्या फांद्यांची छाटणी : १ लाख ३ हजार


मृत झाडे कापली : ६८०

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने