रुग्ण संवाद, उपचार आणि चिकित्सेसाठी आता वैद्य एआय विकसित


रूग्णालय तसेच दवाखान्याच्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर प्रणालीचा वापर


मुंबई : रूग्णांशी संबंधित रक्तचाचणी अहवालातील माहिती ही नागरिकांना सोप्या भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी वैद्य एआय या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात येणार आहे. एआयवर आधारित रुग्णासोबतचा संवाद आणि वैद्यकीय सल्ल्यापूर्वीची माहिती ही डॉक्टरांना बाह्यरूग्ण विभागाच्या ठिकाणी अधिक योग्य सल्ला आणि उपचार देण्यासाठी मदतीची ठरणार आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य संस्थांपैकी राजे एडवर्ड स्मारक (KEM) रूग्णालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रूग्णालय (Kandiwali), राजावाडी रूग्णालय आणि महानगरपालिकेच्या दवाख्यानात प्रायोगिक कालावधीसाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे प्रणाली वापराबाबतचे प्रशिक्षण, नागरिकांचा प्रतिसाद आणि प्रणालीच्या सुरक्षेबाबतचा आढावा महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला घेणे शक्य होईल.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानस्नेही पुढाकार घेत एक महत्वाचा सामंजस्य करार मुंबईमहानगरपालिका आणि फ्रॅक्टल एनॅलिटिक्स लिमिटेड या संस्थेदरम्यान शुक्रवारी ३ जुलै २०२६ रोजी मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे दैनंदिन कामकाज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुलभ व्हावे, यादृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर आधारित वैद्य एआय (वैद्य एआय) हे आरोग्य क्षेत्रासाठीचे समर्पित असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या करारप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य)शरद उघडे, संचालय (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रूग्णालये) शैलेश मोहिते तसेच फ्रॅक्टल एनॅलिटिक्स लिमिटेडचे अधिकारी श्रीकांथ वेलमकन्नी, सूरज अमोणकर, शुभेंदू कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.


कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या पुढाकाराच्या माध्यमातून नागरिकांसोबतचा संवाद वाढवणे, प्राथमिक टप्प्यातील उपचारासाठीची मदत उपलब्ध करून देणे, बहुभाषिक नागरिकांसोबतचा संवाद करणे आणि रूग्णालय प्रशासनाला कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करणे अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आहेत. प्रायोगिक तत्वावर या प्लॅटफॉर्मचा वापर महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेसाठी करण्यात येणार आहे.


मुंबईत आरोग्य सेवा क्षेत्रासाठी विविध आव्हानांना सामोरे जाताना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पुढाकार हा प्रशासनाला कामकाजासाठी मदतीचा ठरणार आहे. महानगरपालिकेच्या यंत्रणेतील मोठ्या प्रमाणातील वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांच्या कामकाजासाठी ही यंत्रणा मदतीचा पर्याय ठरणार असल्याचे मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.


आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळाला अशा तंत्रज्ञानस्नेही पावलांमुळे अधिक लक्ष केंद्रित करून काम करणे शक्य होईल. महानगरपालिकेच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पाऊल हे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. दैनंदिन कामकाजात आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ, डॉक्टरांचे काम अधिक सुलभ करण्यासाठी ही प्रणाली अधिक परिणामकारतरित्या योगदान देईल, असा विश्वास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी व्यक्त केला.


महत्वाची वैशिष्ट्ये


-सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या रूग्णालयात अंमलात आणण्यात आलेली हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (एचएमआयएस) ही प्रणाली वैद्य एआय प्रणालीशी संलग्न करण्यात येईल.


तसेच महत्त्वाच्या आरोग्य सुविधा आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित सूचना नागरिकांना विविध भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


-महानगरपालिकेची व्हॉट्स एप चॅटबॉट प्रणाली तसेच रूग्णालयाचे आणि प्रशासकीय कामकाजाचे पोर्टलही वैद्य एआय चॅटबॉटसोबत संलग्न करण्यात येणार आहेत.


-वैद्य एआय हे प्लॅटफॉर्म हे इंडिया एआय मिशनचा भाग असून एआय फाऊंडेशनल मॉडेल विकसित करण्यामध्ये या संस्थेने योगदान दिले आहे.


-विविध राज्य आणि शासकीय संस्थांमध्ये आरोग्य आणि प्रशासकीय पातळीवर तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये या संस्थेने योगदान दिले आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने