Kurla News: धक्कादायक! कुर्ल्यात झाड कोसळून ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दुकानावर पडलेल्या झाडाखाली अडकल्याने एकाचा मृत्यू 




मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत झाड कोसळण्याच्या (Tree collaps) घटना सुरूच आहेत. रविवारी दुपारी कुर्ला (पश्चिम) येथील नौपाडा परिसरात दुकानावर झाड कोसळून ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.


ही घटना ५ जुलै रोजी दुपारी सुमारे १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली. नौपाडा येथील हिंदी बीएमसी शाळेजवळ, गोम्स गाऊन इमारतीसमोर एका दुकानावर मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. (Kurla News)



घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट आणि संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी व्यक्तीला तातडीने फौझिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Heavy rain)


रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, युनूस कुंदावाला (वय ६३) यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.


या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. झाड हटवून परिसर सुरक्षित करण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून करण्यात आले.



दरम्यान, पावसाळ्यात झाड कोसळण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक नसल्यास मोठ्या झाडांच्या परिसरात थांबणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मागील आठवड्यात चेंबुर येथील एका शाळेच्या बसवर झाड कोसळले होते. या दुर्घटनेत ११ वर्षाच्या विद्यार्थ्याने प्राण गमावले होते.

Comments
Add Comment

BMC Water Pipeline Leakage : पाणी गळती दुरुस्तीच्या कामांसाठी घाटकोपरला २७ कोटींचा ‘बूस्टर’!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर भागातील जलवाहिनीतून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या जल

Kandivali : स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन बस अपघातातील जखमी युवकावर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात उपचारास नकार!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मालाड – मार्वे रोड, स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे झालेल्या भीषण बस अपघातात २१

Kandivali : कांदिवलीतील डॉ.बाबासाहेब रुग्णालयातील साहित्य खरेदीत गैरव्यवहार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या कांदिवलीतील (Kandivali) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापालिका

BMC : घाटकोपर, मानखुर्द चेंबूर परिसरातील ०६ अनधिकृत लॉजवर जप्तीची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अनधिकृत व्यवसाय आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात महानगरपालिकेकडून कारवाई सुरू आहे. या

मुंबईत ५१ दिवसांमध्ये १६,१५३ बॅनरांची फाडाफाडी

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या बॅनरबाजांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात असून

मुंबई पुस्तक महोत्सवाला राज्यपालांची हजेरी! विविध पुस्तक दालनांची पाहणी; पुस्तकांचीही केली खरेदी

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भेट