Lawrence Bishnoi Gang : लॉरेन्स बिश्नोई गँगचे दोन शूटर पोलिसांच्या चकमकीत ठार

हरियाणा : हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हांसीमध्ये १० जून रोजी एका जिम ट्रेनरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा व्हिडिओ देखील समोर आला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये, जिमसमोर वॉर्म-अप करत असलेल्या कपिलवर गोळीबार होताना दिसत होता. बाईकवरून आलेल्या संशयितांनी पाच सेकंदात १० गोळ्या झाडल्या. नंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होता. आता, या घटनेच्या २४ दिवसांनंतर, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि हरियाणा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) या प्रकरणातील दोन आरोपींना चकमकीत ठार केले आहे. गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांनी बहादूरगडमध्ये दोन्ही आरोपींना घेरले, जिथे ते चकमकीत ठार झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.(Lawrence Bishnoi Gang)



दोन्ही यंत्रणांनी बहादूरगडमध्ये संयुक्त कारवाई केली, जिथे प्रत्येकी २ लाख रुपयांचे बक्षीस असलेले लॉरेन्स बिश्नोई टोळीचे दोन गुन्हेगार चकमकीत ठार झाले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, हिसारचे रहिवासी असलेले प्रवेश आणि हिमांशू हे शस्त्रसज्ज असून बहादूरगड परिसरात एक मोठा गुन्हा करण्याची योजना आखत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, दिल्ली पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स स्पेशल सेल आणि हरियाणा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) संयुक्त कारवाई केली.(Lawrence Bishnoi Gang)



पोलिसांनी जेव्हा दोन्ही गुन्हेगारांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गुन्हेगारांनी गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत, दोन्ही फरार गुन्हेगार जखमी झाले. एक पोलीस अधिकारीही जखमी झाला. तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, जखमी गुन्हेगारांची ओळख प्रवेश आणि हिमांशू अशी पटली असून, दोघेही हिसारचे रहिवासी आहेत.१० जून २०२६ रोजी हांसी येथे दिवसाढवळ्या झालेल्या जिम मालक कपिल यांच्या हत्येप्रकरणी दोन्ही आरोपी फरार होते. हत्येपासून दोघेही फरार होते आणि त्यांच्यावर प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. ते दोघे बहादूरगडमध्ये कोणता गुन्हा करण्याची योजना आखत होते आणि त्यांच्याकडून कोणती शस्त्रे जप्त करण्यात आली, याचाही तपास सुरू आहे.(Lawrence Bishnoi Gang)

Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

BMC : मुंबई महापालिकेत महायुतीचे २०० दिवस पूर्ण; पुढील ५ वर्षांत बदलणार मुंबईचा चेहरामोहरा?

मुंबई महापालिकेत महायुतीच्या सत्तेचे २०० दिवस पूर्ण भाजपच्या कार्यकारीणीत मांडला राजकीय प्रस्ताव पुढील पाच

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवणार?’ एकनाथ शिंदेंनी सुनावले खडे बोल

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या

Gautami Patil's programs Ban Demand : मुंबईतील दहीहंडी व गणेशोत्सवात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवर बंदी घाला; मुंबई शिक्षक मंडळाची मुख्यमंत्री व पोलीस प्रशासनाकडे मागणी

मुंबई : मुंबईतील दहीहंडी, गणेशोत्सव व इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक शालीनता, धार्मिक

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील