Mumbai Rain Update : मुंबईत जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत २४ तासांत सुमारे ७४ टक्के पाऊस

मागील चार दिवसांत ५८८ मिलीमीटर पावसाची नोंद


समुद्राला मोठी भरती आणि संततधार पाऊस, तरीही मुंबईतील जनजीवन सुरळीत



मुंबई : मुंबईतील विविध भागांमध्‍ये मागील २४ तासांत सुमारे २५० ते ३०० मिलीमीटर पावसाची (Rain) नोंद झाली. हे प्रमाण जुलै महिन्याच्या सरासरीच्या ७४ टक्के असून वार्षिक हंगामाच्या २५ टक्के इतके आहे. या कालावधीदरम्यान समुद्राला मोठी भरती आणि संततधार पाऊस सुरू असूनही मुंबईतील जनजीवन सुरळीत राहिले. सुमारे १० सखल भागांच्या ठिकाणी पाणी साचल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेसह विविध यंत्रणांचे सुमारे १० हजार अधिकारी, कर्मचारी कार्यक्षेत्रांवर (On Ground) अविरतपणे कार्यरत आहेत. तसेच, वरिष्ठ अधिकारीही  प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.


मुंबईत (Mumbai) वर्षभरात सुमारे २३१८ मिलीमीटर पाऊस पडतो. तर, जुलै महिन्यात साधारणपणे ८०० मिलीमीटर (mm) इतका पाऊस होतो. तथापि, मागील चार दिवसांपासून बृहन्मुंबई क्षेत्रात संततधार पाऊस कोसळत आहे. या चार दिवसांत मुंबईत सुमारे ५८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलै महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण ७४ टक्के इतके आहे. तर, दिनांक ३ ते ४ जुलै २०२६ या २४ तासांच्या कालावधीत मुंबईत सुमारे २५० ते ३०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हे प्रमाण वार्षिक हंगामी पावसाच्या २५ टक्के आणि जुलै महिन्याच्या ४० टक्के इतके आहे. मागील २४ तासांत मुंबई उपनगरातील विक्रोळी येथे सर्वाधिक ३१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ही मागील वर्षातील सर्वोच्च नोंद आहे. तथापि, दिनांक ४ जुलै २०२६ रोजी दुपारी २:५० वाजता समुद्राला ४:२६ मीटर उंचीची भरती होती. इतक्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस आणि समुद्राला भरती असूनदेखील बृहन्मुंबई क्षेत्रातील जनजीवन दिनांक ४ जुलै २०२६ रोजी सुरळीत होते. शहर आणि उपनगरांतील रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.



या कालावधीत, मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे मुंबईत झाडांच्या व फांद्यांच्या अनुषंगाने १०३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १८ तक्रारी झाडे पडल्याच्या होत्या. एकूण १७ घरे व भिंती पडल्याच्या घटनांची देखील नोंद झाली होती. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुमारे १० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून प्राप्त झाल्या. मात्र, संबंधित ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेळीच उपाययोजना करुन पाण्याचा निचरा केला. दरम्यान, भांडूप (पश्चिम) येथील लाल बहादूर शास्त्री मार्गालगत खाजगी विकासकाच्या बांधकाम क्षेत्रामध्ये खोदकामाचा भाग कोसळल्याची घटना घडली. सदर ठिकाणी महानगरपालिकेकडून बॅरिकेडींग करुन सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने