मुंबई : मुंबई महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.
भारतीय हवामान विभागाने उद्या मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच या कालावधीत सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या, मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बृहन्मुंबई महानगरपालिका) १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा.
तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.