Dadar Tree Collapse : दादरमध्ये भलंमोठं झाड कोसळलं! प्लाझाजवळ पार्क केलेल्या कारचा चक्काचूर; अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असून, आज म्हणजेच सोमवार ६ जुलै दादर परिसरात आणखी एक मोठी घटना घडली. दादर प्लाझाजवळ आशीर्वाद टायर दुकानाशेजारी भलंमोठं झाड अचानक कोसळल्याने तेथील पार्क केलेल्या एका कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (Dadar Tree Collapse)


झाड कोसळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. झाड थेट पार्क केलेल्या कारवर पडल्याने वाहनाचा चक्काचूर झाला. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी झाडाखाली किंवा कारमध्ये कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Dadar Tree Collapse)



घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि संबंधित महापालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. झाड कापून बाजूला करण्याचे आणि वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. (Dadar Tree Collapse)



गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडत आहेत. हवामान विभागानेही मुंबईसाठी जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱ्याचा इशारा दिल्याने नागरिकांनी झाडांच्या परिसरात वाहनं उभी करणे टाळावे, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Dadar Tree Collapse)




Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक