Mumbai Rain Alert : गरज असेल तरच घराबाहेर पडा!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; दुपारनंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता




मुंबई : "गेल्या काही तासांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांत गंभीर परिस्थिती ओढवलेली आहे. आज दुपारनंतर मुंबईसह किनारपट्टीच्या भागांत ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, पुढील काही तास झाडे कोलमडणे किंवा इतर दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सजग राहावे आणि अत्यंत अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे किंवा प्रवास करणे पूर्णपणे टाळावे," असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत केले.



हवामान विभागाने वर्तवलेली पावसाची स्थिती लक्षात घेऊन मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून, नोकरदारांसाठी 'वर्क फ्रॉम होम'ची विनंती करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. फडणवीस म्हणाले, "मुंबईत दरवर्षी संपूर्ण मान्सून हंगामात सरासरी ८०० झाडे पडतात. मात्र, काल ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे एकाच दिवसात तब्बल ३५० झाडे कोसळली आहेत. यावरून परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना येईल. विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे नक्कीच गंभीर आहेत, पण हे निसर्गाचे विपरित रूप आहे. प्रशासन पूर्वतयारीपेक्षा अधिक वेगाने काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत आहे." (Mumbai Rain Alert)



मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळल्याच्या घटनेचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "कनेक्टिंग रिंगपाशी दरड कोसळताच तात्काळ वाहतूक रोखून ती डायव्हर्ट करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी प्रवाशांना रस्ता बंद असल्याचे सांगण्यात आले असून, अडकलेल्या गाड्या आणि लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी रस्ता खचून पाणी साठल्यामुळे लहान गाड्या अडकल्या आहेत, तिथे मदतकार्य सुरू आहे. आजची वादळी परिस्थिती पाहता तरुणांनी पावसात फिरणे, धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनाला जाणे पूर्णपणे टाळावे", असे आवाहन देखील त्यांनी केले.



मानखुर्दमध्ये बेकायदेशीर इमारतीमुळे दुर्घटना



मानखुर्द येथे रविवारी घडलेल्या इमारत दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, "ती इमारत पूर्णपणे बेकायदेशीर होती. ती शेजारील झोपड्यांवर कोसळल्यामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे, ही घटना वेदनादायी आहे. अशा संकटसमयी राजकारण बाजूला ठेवून संवेदनशीलतेने काम करावे लागेल. मृतांची आकडेवारी देऊन गेलेले प्राण परत येत नाहीत. आज दुपारनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेत असून सर्व यंत्रणांना 'अलर्ट मोड'वर ठेवले आहे. सध्या प्राथमिक निवेदन तयार असले, तरी अर्धवट माहिती देण्याऐवजी, उद्या (मंगळवारी) या संपूर्ण परिस्थितीवर आणि सरकारच्या उपाययोजनांवर मी सभागृहात सविस्तर निवेदन करेन", असे फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून