Atul Bhatkhalkar : मालाडमधील शाळेत प्रार्थनेच्या नावाखाली धर्मांतर? अतुल भातखळकर यांचा आरोप

अंधश्रद्धा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल


मुंबई : मालाड पश्चिम येथील रिजॉयस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना कार्यक्रमात विद्यार्थ्यांना धर्मांतरासाठी आग्रह केला जात असल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मंगळवारी विधानसभेत केला. त्यावर, प्राप्त तक्रारीची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.




राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले की, १० मे २०२६ रोजी मालाड पश्चिम येथील रिजॉयस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमात एका व्यक्तीने उपस्थितांच्या डोक्यावर हात ठेवून आजार बरे करण्यासह जीवनातील दुःख दूर करण्याबाबत दावे केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी केली असता, उपस्थितांना धर्मांतर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आग्रह करण्यात आल्याचे आढळून आले नाही. तथापि, चौकशीदरम्यान तक्रारदाराला घरामध्ये देवी-देवतांची छायाचित्रे लावू नयेत, असे सांगण्यात आल्याचे निष्पन्न झाले; तसेच संबंधित कार्यक्रमातून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार निदर्शनास आल्याने मालाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींसह महाराष्ट्र नरबळी, इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.




या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. शाळांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित होऊ नयेत यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत आवश्यक आदेश निर्गमित करण्याबाबतही कार्यवाही करण्यात येईल, असे भोयर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके