Devendra Fadnavis : शरद पवारांचा पक्ष 'एनडीए'सोबत येणार ही पेरलेली बातमी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्रातून एनडीएत कोणताही नवा पक्ष येणार नाही


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आल्यानंतर शरद पवार गट सत्तेत सामील होणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले असून, "शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येणार, ही एक 'पेरलेली बातमी' आहे. या बातमीत किंवा सुरू असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नाही. आगामी काळात महाराष्ट्रातून 'एनडीए'मध्ये कोणत्याही नवीन पक्षाचा समावेश केला जाणार नाही", असे त्यांनी (Devendra Fadnavis) स्पष्ट केले.


मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) मंगळवारी सायंकाळी दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी काही महत्त्वाच्या राजकीय भेटीगाठी घेतल्याचे बोलले जात आहे. दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्र्यांना शरद पवार यांच्या पक्षाच्या आगामी राजकीय भूमिकेविषयी आणि ते एनडीएसोबत येण्याच्या शक्यतेविषयी विचारणा करण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना त्यांनी या सर्व चर्चांमधील हवा काढून घेतली. फडणवीस म्हणाले की, "शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार नाही. महाराष्ट्रातून एनडीएत कोणताही नवा पक्ष येणार नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. आम्ही आमच्यासोबत आता कोणत्याही नवीन घटकाला किंवा पक्षाला जोडणार नाही. सध्या जे मित्रपक्ष सोबत आहेत, त्यांच्यासहच आगामी वाटचाल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.



विनोद तावडे-जयंत पाटील यांच्यात गुप्त भेट?


- विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत शरद पवार यांचा पक्ष जर महायुती आणि केंद्र स्तरावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी झाला, तर पक्षाच्या वाट्याला सत्तेत काय वाटा येऊ शकतो, यावर सविस्तर खल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
- या दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर जयंत पाटील यांनी लागलीच राष्ट्रवादीच्या आणखी एका अत्यंत वरिष्ठ नेत्याची भेट घेऊन चर्चा केली. शरद पवार यांच्या पक्षात सध्या सत्तेत सहभागी होण्याबाबत दोन मतप्रवाह असल्याचे बोलले जात आहे. यातील एका गटाला सत्ताधारी बाकांवर बसण्याची इच्छा आहे, तर दुसरा गट विरोधी पक्षातच राहण्यावर ठाम आहे.
- या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांनी आपल्या पक्षातील एका ज्येष्ठ नेत्यावर विधानसभेतील १० आमदार आणि लोकसभेतील ८ खासदारांशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेण्याची, तसेच भाजपच्या वरिष्ठ पातळीवर बोलणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याची चर्चा आहे.
- या संपूर्ण प्रकरणावर जयंत पाटील यांना विचारले असता, त्यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी मुंबईत भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, ही बैठक केवळ अनौपचारिक चर्चेसाठी होती, असे सांगत त्यांनी यातील राजकीय तपशील जाहीर करण्याचे टाळले. (Devendra Fadnavis)



चर्चांमध्ये तथ्य नाही - सुप्रिया सुळे


याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला अशी कुठली बैठक झाल्याचे माहीत नाही. विनोद तावडे आणि मी देखील अनेकवेळा भेटलो आहे. आम्ही दोघेही संयुक्त संसदीय समितीत असल्याने मागच्या महिन्याभरात २१ वेळा भेटलो असू. ते एकटेच नाही तर भाजपाच्या अनेक लोकांशी माझी भेट झाली आहे. ज्या काही चर्चा वगैरे चालल्या आहेत त्याची मला खरेच गंमत वाटते आहे. अशा प्रकारच्या चर्चा मागच्या १२ वर्षांपासून सुरू आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. (Devendra Fadnavis)

Comments
Add Comment

रशियात शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा धोका आहे का, किती नुकसान झाले?

मॉस्को : रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्प परिसरात शुक्रवारी भूकंपाचे अत्यंत तीव्र धक्के जाणवले.

Navi Mumbai Airport आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तयार नाही? एमिरेट्सचा दावा; NMIA कडून खंडन!

मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या परदेशी विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या एमिरेट्स कंपनीने, खानपान आणि मालवाहू गोदाम

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यापूर्वी टीम इंडियाने हुकमी एक्का काढला, झालं असं की..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियात एक बदल करण्यात

Lakme Fashion Week : लडाखच्या 'पश्मिना' आणि पारंपरिक हस्तकलेचा नवी दिल्लीत डंका!

नवी दिल्ली : लडाखचे जगप्रसिद्ध 'पश्मिना' (Pashmina), सुंदर शाली आणि तिथल्या हाताच्या अप्रतिम कलाकुसरीची जादू सध्या

Skin Treatment : सणासुदीच्या काळात त्वचेला ग्लो देण्यासाठी 5 खास स्किन ट्रीटमेंट्स; जाणून घ्या कधी कराव्यात?

दिवाळीत त्वचेवर नैसर्गिक चमक आणि ग्लो मिळवण्यासाठी सणांच्या काही दिवस आधी योग्य स्किन ट्रीटमेंट्स घेणे

जनाब संजय राऊत माफीवीर! भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा हल्लाबोल; महाराष्ट्रासह देशातील जनतेचीही माफी मागण्याची मागणी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्याच्या मुद्द्यावरून भाजपने उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका