Mumbai-Nanded Weekly Trains : आनंदवार्ता! मुंबई आणि नांदेड दरम्यान नियमितपणे २ साप्ताहिक गाड्या सुरू

मुंबई : मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान नियमितपणे चालणाऱ्या २ साप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत. दिनांक ६ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र आणि उत्तराखंडचे माननीय मुख्यमंत्री, माननीय रेल्वे मंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या दोन गाड्यांचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. (Mumbai-Nanded Weekly Trains)



लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) - नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) एक्सप्रेसची नियमित सेवा खालीलप्रमाणे सुरू होईल:


* गाडी क्रमांक 17667 हुजूर साहेब नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक ०८.०७.२०२६ पासून
* गाडी क्रमांक 17668 लोकमान्य टिळक टर्मिनस - हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस दिनांक ०९.०७.२०२६ पासून
* गाडी क्रमांक 17665 हुजूर साहेब नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक १३.०७.२०२६ पासून आणि
* गाडी क्रमांक 17666 लोकमान्य टिळक टर्मिनस - हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस दिनांक १४.०७.२०२६ पासून सुरू होईल. (Mumbai-Nanded Weekly Trains)



नियमित फेऱ्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:


(अ) गाडी क्रमांक 17668 / 17667 लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) - नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) साप्ताहिक एक्सप्रेस:
गाडी क्रमांक 17668 लोकमान्य टिळक टर्मिनस - नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक ०९.०७.२०२६ पासून दर गुरुवारी १६.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि हुजूर साहेब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 17667 नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक ०८.०७.२०२६ पासून दर बुधवारी २१.१५ वाजता हुजूर साहेब नांदेड येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता पोहोचेल. (Mumbai-Nanded Weekly Trains)


थांबे: कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत आणि पूर्णा.



(ब) गाडी क्रमांक 17666 / 17665 लोकमान्य टिळक टर्मिनस - नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस:


गाडी क्रमांक 17666 लोकमान्य टिळक टर्मिनस - नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक १४.०७.२०२६ पासून दर मंगळवारी १६.३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि हुजूर साहेब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल. (Mumbai-Nanded Weekly Trains)


गाडी क्रमांक 17665 नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक १३.०७.२०२६ पासून दर सोमवारी २१.१५ वाजता हुजूर साहेब नांदेड येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.४० वाजता पोहोचेल.


थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत आणि पूर्णा.


दोन्ही गाड्यांची संरचना: १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, २ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ जनरेटर व्हॅन आणि १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.


आरक्षण: गाडी क्रमांक 17666 आणि गाडी क्रमांक 17668 साठी आरक्षण दिनांक ०८.०७.२०२६ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. प्रवासी तिकीट आरक्षणासाठी 'रेलवन' ॲप देखील डाउनलोड करू शकतात. या गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. (Mumbai-Nanded Weekly Trains)

Comments
Add Comment

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन