Police Suicide : मुंबईच्या लोकभवनात SRPF जवानाची आत्महत्या; गार्ड ड्युटीवर असताना सर्व्हिस रायफलमधून झाडली गोळी

मुंबई : मलबार हिल (Malabar Hill) येथील लोकभवन (Lokbhavan) परिसरात सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) एका जवानाने ड्युटीदरम्यान स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे राजभवन परिसरात एकच खळबळ उडाली.



मृत जवानाचे नाव कौस्तुभ सांगळे (Kaustabh Sangle) असून ते एसआरपीएफ ग्रुप १६, कोल्हापूर येथील पोलीस अंमलदार होते. सध्या त्यांची नियुक्ती मुंबईतील राजभवनाच्या सुरक्षेसाठी करण्यात आली होती. घटनेच्या वेळी ते राजभवन परिसरातील 'लोक भवन' येथे गार्ड ड्युटीवर होते.


प्राथमिक माहितीनुसार, कौस्तुभ सांगळे यांनी ड्युटीदरम्यान त्यांच्या सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकताच इतर सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी धावले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. (Mumbai Police)



घटनेची माहिती मिळताच मलबार हिल पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे अन्वेषण पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे.


या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक कारण, मानसिक तणाव किंवा इतर कोणते कारण होते का, याचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.


दरम्यान, पोलिसांकडून राजभवनातील सुरक्षा कर्मचारी आणि सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले जात असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.



Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा