Nashik Rain News : नाशिकवरील ढगफुटीसदृश पावसाचं संकट टळलं, जिल्हा प्रशासनाची महत्वाची माहिती

Nashik Rain News : जूनमध्ये नाशिककडे पाठ फिरवलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि जिल्ह्यात हजेरी लावली आहे. शहरात २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ढगसदृश्य पावसाची शक्यता नाशिकमध्ये वर्तवली होती. मात्र आता नाशिककरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.



ढगफुटीसदृश पावसाचं संकट तूर्तास टळलं


नाशिक आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) परिसरावर घोंगावणारे ढगफुटीसदृश (Cloudburst) पावसाचे मोठे संकट तूर्तास टळले आहे. नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाचा हाय अलर्ट (High alert) जारी करण्यात आला होता. मंगळवारी पहाटेपर्यंत नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. मंगळवारी सकाळी पावसाने नाशिक शहर परिसरात काही काळ विश्रांती घेतली असली तरी त्र्यंबकेश्वर,आणि इगतपुरी या परिसरात सध्या प्रचंड पाऊस पडत आहे.



वाऱ्याची दिशा बदलली , ढग सुरतच्या दिशेने


हवामान विभागाने पालघरमध्ये मोठ्याप्रमाणावर पावसाला कारणीभूत असणारा भोवरा (Vortex) मंगळवारी नाशिक परिसरात सरकेल, असे भाकीत वर्तवले होते. मात्र, आता भोवरा इतर दिशेने वळल्यामुळे नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळण्याची शक्यता आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याच्या प्रवाहामुळे सोमवारी पालघरमध्ये तब्बल ४५० मिलिमीटर इतका मुसळधार पाऊस पडला होता. हाच भोवरा पुढे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या पट्ट्यात सरकण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.


मात्र, वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे हे धोकादायक ढग आता नाशिक सोडून अहिल्यानगर (अहमदनगर) आणि गुजरातच्या सुरत शहराच्या दिशेने पुढे सरकले आहेत. त्यामुळे नाशिकवरील थेट ढगफुटीचा धोका आता टळला आहे. दरम्यान, नाशिक, इगतपुरी त्रंबकेश्वर भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुसळधार पावसाचा अंदाज कायम असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



जिल्ह्यात किती मिलीमीटर पाऊस?


इगतपुरी – २००


सुरगाणा – १४९


त्र्यंबकेश्वर – १२५


सिन्नर – ७४


पेठ – ६१


दिंडोरी – ५८


पिंपळगाव बसवंत – ५१.५


सटाणा बागलाण – ४७


निफाड – ४५.२


कळवण -४०


देवळा – ४०


येवला – १५


नांदगाव-१


धोकादायक ढग आता नाशिक सोडून अहिल्यानगर (अहमदनगर) आणि गुजरातच्या सुरत शहराच्या दिशेने पुढे सरकले असले तरी नाशिकमध्ये जोरदार पावसाची बॅटिंग सुरूच आहे , त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेत अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.