Agra ARTO Raid : माजी सरकारी अधिकाऱ्याच्या घरात 'कुबेराचा खजिना'; २२ किलो सोनं-चांदी, १.६२ कोटींची रोकड जप्त

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) येथे एका माजी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या (ARTO) घरावर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (व्हिजिलन्स) कारवाईदरम्यान घरातून मोठ्या प्रमाणात सोनं, चांदी, रोख रक्कम आणि स्थावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली.  (Agra ARTO Raid)



तपास पथकाने दिलेल्या माहितीनुसार, माजी अधिकारी ललित कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकल्यानंतर सुमारे २२ किलो सोन्या-चांदीचे दागिने, विटा आणि बिस्किटे सापडली. यामध्ये सुमारे १३ किलो सोनं आणि ९ किलो चांदीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.


याशिवाय घरातून १.६२ कोटी रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. विविध ठिकाणी ठेवलेल्या नोटांच्या बंडलांची मोजणी करण्यासाठी तपास यंत्रणेला मोठी मेहनत घ्यावी लागली.



तपासादरम्यान माजी अधिकाऱ्याच्या नावावर आग्रा आणि इतर भागांमध्ये अनेक प्लॉट, शेतीजमीन आणि आलिशान मालमत्ता असल्याची माहितीही समोर आली आहे. या सर्व मालमत्तेची बाजारातील किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपांप्रकरणी सुरू असलेल्या तपासाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, जप्त केलेल्या मालमत्तेचा स्रोत आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. संबंधित प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली आहे.



Comments
Add Comment

Cyclone Arnab Update: सावधान! भारतासह नेपाळवर 'अर्णब' चक्रीवादळाचे भीषण संकट, 5 जणांचा मृत्यू तर 57 ट्रेन रद्द!

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाने बुधवारी, 28 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेश आणि

Indian Railway News: प्रवाशांनो, एक्स्प्रेसमध्ये रात्री 11 ते पहाटे 5 मोबाइल चार्जिंग करता येणार नाही! नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: रेल्वेने जुने नियम पुन्हा आमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. लांबपल्ल्याच्या प्रवाशाला जाणाऱ्या

चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला, 20 ची कचोरी पडली 20 लाखांना; कसं काय CCTV व्हिडिओमधून प्रकार उघड

जयपूर : अवघ्या 20 रुपयांची कचोरी खाण्यासाठी थांबलेल्या एका कलेक्शन एजंटला तब्बल 20 लाख रुपयांचा फटका बसल्याची

सुप्रीम कोर्टात नोकरी मिळवण्याची संधी! पात्रता, पगार आणि अर्जाची संपूर्ण माहिती

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (Supreme Court of India) मध्ये 'कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)' या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, सरकारी

नोएल टाटा १२ नोव्हेंबरला सहा कंपन्यांच्या मंडळातून पायउतार होणार , टाटा सन्सवर कायम

टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा १२ नोव्हेंबर २०२६ रोजी टाटा समूहाच्या सहा कंपन्यांच्या संचालक मंडळातून

Andhra Odisha Cyclone : 'अर्णब' चक्रीवादळाचा आंध्र-ओडिशात प्रचंड हाहाकार; विशाखापट्टणममध्ये १८ तासांत ढगफुटीसदृश पाऊस, ३ जणांचा मृत्यू तर ८७ हजार नागरिकांचे स्थलांतर

विशाखापट्टणम : बंगालच्या उपसागरात आकारास आलेल्या 'अर्णब' या अतितीव्र चक्रीवादळाने मंगळवारी आंध्र प्रदेशच्या