Moshi building collapse : मोशी इमारत दुर्घटना : एकाचा मृत्यू, सहा जण अद्याप ढिगाऱ्याखाली; २२ तासांपासून बचावकार्य सुरू

पुणे : मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील दुमजली इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, आणखी सहा जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. गेल्या २२ तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत १७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. (Moshi building collapse)


दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), अग्निशमन दल, पोलिस, महापालिका प्रशासन तसेच दक्षिण मुख्यालयाच्या संयुक्त कृती दलातील अभियंता आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात असून, समन्वयाने बचावकार्य सुरू आहे. (Moshi building collapse)



मोशी कचरा डेपोमध्ये शहरातील घनकचरा अनेक वर्षांपासून साठवला जात असल्याने परिसरात कचऱ्याचे मोठे ढिगारे तयार झाले आहेत. याच ठिकाणी ‘अँटनी लॉरा’ कंपनीकडून कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू असून, कचऱ्याच्या ढिगाऱ्यालगत पार्किंगसह दुमजली प्रशासकीय इमारत उभारण्यात आली होती. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा मोठा ढिगारा इमारतीवर कोसळला आणि इमारत क्षणार्धात जमीनदोस्त झाली. (Moshi building collapse)



बचावकार्यात अडकलेल्या व्यक्तींना कोणतीही इजा होऊ नये, यासाठी अत्यंत सावधगिरीने काम सुरू असल्याचे एनडीआरएफने सांगितले. मोठ्या यंत्रसामग्रीचा वापर केल्यास संपूर्ण इमारत आणखी कोसळण्याचा धोका असल्याने बचाव पथकाने ब्रेकरच्या साहाय्याने इमारतीच्या एका बाजूला भोक पाडून आत प्रवेश केला आहे. इमारतीत मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असल्याने बचावकार्य आव्हानात्मक ठरत असून, अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. (Moshi building collapse)

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने