Nandigram Express Honeymoon Decoration : नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये हनीमून डेकोरेशन पडलं महागात; नियमभंगामुळे CTI निलंबित

मुंबई : नंदीग्राम एक्सप्रेस (Nandigram Express) मधील फर्स्ट एसी (First AC) कोचमध्ये हनीमून (Honeymoon) साठी बर्थ फुलं आणि फुग्यांनी सजवल्याचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अंतर्गत चौकशीत (Investigation) रेल्वेच्या सुरक्षा (Security) आणि प्रवेश (Entry) नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आल्यानंतर नांदेड येथील चीफ तिकीट निरीक्षक (Chief Ticket Inspector - CTI) गिरीश कुमार यांना निलंबित (Suspend) करण्यात आलं आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.


ही घटना ट्रेन क्रमांक ११००२ (11002) बल्लारशाह–मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसच्या फर्स्ट एसी कोचमधील बर्थ क्रमांक १९ आणि २० वर घडली. नवविवाहित जोडपं शुभम आणि सोनाली यांच्यासाठी बर्थची विशेष सजावट (Decoration) करण्यात आली होती. ही सजावट जालन्यातील राहत डेकोरेटरने ऑनलाइन (Online) बुकिंग (Booking) स्वीकारल्यानंतर केल्याची माहिती समोर आली आहे.







चौकशीत धक्कादायक बाब समोर आली असून संबंधित डेकोरेटर कोणतीही अधिकृत परवानगी (Permission) न घेता जालना रेल्वे स्थानकावरून थेट फर्स्ट एसी कोचमध्ये चढला आणि बर्थ सजवून बाहेर पडला. रेल्वेच्या नियमांनुसार कोणत्याही बाहेरील व्यक्तीला परवानगीशिवाय आरक्षित (Reserved) एसी कोचमध्ये प्रवेश करता येत नाही. त्यामुळे हा प्रकार सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन असल्याचं रेल्वेने स्पष्ट केलं आहे.


रेल्वे प्रशासनाने सांगितलं की, कोणतीही व्यक्ती किंवा डेकोरेटर अधिकृत परवानगीशिवाय रेल्वेच्या कोचमध्ये सजावट करू शकत नाही. वाढदिवस, लग्न, हनीमून किंवा इतर कोणत्याही खास प्रसंगासाठी डेकोरेशन करायचं असल्यास रेल्वेची पूर्वपरवानगी घेणं आणि सर्व अधिकृत नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे.


या प्रकरणात ड्युटीवर (Duty) असताना आवश्यक खबरदारी न घेतल्याचा ठपका ठेवत सीटीआय गिरीश कुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच डेकोरेटरला फर्स्ट एसी कोचमध्ये प्रवेश कसा मिळाला, याचा तपास सुरू असून या प्रकरणात इतर कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा