Nashik : प्रसिद्ध अभिनेत्रीला ग्राहक आयोगाचा दणका; नाशिकच्या निवृत्त डॉक्टरांना मानधनासह भरपाई देण्याचे आदेश

Nashik : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री मौशमी चॅटर्जी (Moushumi Chatterjee) यांना नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मोठा दणका दिला आहे. संपूर्ण मानधन, विमान प्रवास आणि पंचतारांकित हॉटेलमधील सर्व सुविधा स्वीकारूनही ऐनवेळी कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याप्रकरणी आयोगाने त्यांना नाशिकच्या निवृत्त महिला डॉक्टरांना मानधन परत करण्यासह मानसिक त्रासाची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात नाशिक येथील ७४ वर्षीय सेवानिवृत्त शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा वानखेडे (Dr. Aruna Wankhede) यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.



नेमकं प्रकरण काय ?


डॉ. अरुणा वानखेडे यांनी त्यांच्या वैद्यकीय तुकडीच्या ५५ व्या स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन १८ नोव्हेंबर २०२३ रोजी गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अभिनेत्री मौशमी चॅटर्जी यांना प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. डॉ. वानखेडे यांनी एका महिला एजंटमार्फत मौशमी चॅटर्जी यांच्याशी संपर्क साधला होता. कार्यक्रमासाठी तीन लाख रुपयांचे मानधन निश्चित करण्यात आले. त्यानुसार दोन लाख रुपये आरटीजीएसद्वारे तर उर्वरित एक लाख रुपये गोव्यात पोहोचल्यानंतर रोख स्वरूपात देण्यात आले. याशिवाय अभिनेत्री आणि त्यांच्या सहाय्यकासाठी मुंबई-गोवा विमान (Mumbai-Goa flight) प्रवासाची तिकिटे तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आयोजकांनी केली होती.


१७ नोव्हेंबर २०२३ रोजी मौशमी चॅटर्जी गोव्यात दाखल झाल्या. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले आणि उर्वरित मानधनही त्यांना देण्यात आले. मात्र, डॉ. अरुणा वानखेडे यांच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे त्या स्वतः स्वागतासाठी उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. याच कारणाचा आणि करारातील अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करत मौशमी चॅटर्जी यांनी दुसऱ्याच दिवशी कार्यक्रमाला उपस्थित न राहता थेट मुंबईला परत जाण्याचा निर्णय घेतला.



मौशमी चॅटर्जींना ग्राहक आयोगाचा दणका


कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या गैरहजर राहिल्याने आयोजकांची मोठी गैरसोय झाली. वारंवार ई-मेलद्वारे मानधन परत करण्याची मागणी करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर डॉ. वानखेडे यांनी नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात (Nashik District Consumer Disputes Redressal Commission) दाद मागितली. या प्रकरणाची सुनावणी करताना आयोगाच्या अध्यक्षा शिल्पा एस. डोळहारकर यांनी अभिनेत्रीच्या वतीने मांडण्यात आलेला "हा वैयक्तिक सेवा करार असल्याने ग्राहक संरक्षण कायदा लागू होत नाही" हा युक्तिवाद फेटाळून लावला.


आयोगाने स्पष्ट केले की, कार्यक्रमासाठी संपूर्ण मानधन आणि इतर सर्व सुविधा स्वीकारल्यानंतर कार्यक्रमाला अनुपस्थित राहणे ही सेवेतील गंभीर त्रुटी आहे. त्यामुळे आयोगाने मौशमी चॅटर्जी यांना तक्रारदाराकडून घेतलेले तीन लाख रुपयांचे मानधन ९ टक्के वार्षिक व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी एक लाख रुपयांची भरपाई तसेच खटल्याचा खर्च म्हणून २५ हजार रुपये स्वतंत्रपणे देण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत.


ग्राहक आयोगाचा हा निर्णय ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा आणि व्यावसायिक जबाबदारी स्वीकारलेल्या सेलिब्रिटींनाही कराराचे पालन करणे बंधनकारक असल्याचा स्पष्ट संदेश देणारा ठरला आहे.

Comments
Add Comment

Dhanush-Mammootty Movie : धनुष आणि ममूटी पहिल्यांदाच एकत्र झळकणार ? ‘OM: Chapter 1’ चित्रपटाची चर्चा, रिलीज डेट आली समोर

Dhanush-Mammootty Movie : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात पाहायला मिळणार असल्याच्या चर्चेने

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण