मध्य रेल्वेतर्फे 'उर्स' उत्सवासाठी ४ अनारक्षित विशेष गाड्या


मुंबई : 'उर्स' उत्सवासाठी प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) - नागपूर आणि नागपूर - नाशिक रोड दरम्यान ४ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.



१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर अनारक्षित विशेष गाडी (२ सेवा)


गाडी क्रमांक 01021 (अनारक्षित विशेष) दिनांक ११.०७.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथून ००:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५:४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01022 (अनारक्षित विशेष) दिनांक १२.०७.२०२६ रोजी नागपूर येथून २१:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३:५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथे पोहोचेल.



थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.



२) नागपूर - नाशिक रोड अनारक्षित विशेष गाडी (२ सेवा)


गाडी क्रमांक 01203 (अनारक्षित विशेष) दिनांक १२.०७.२०२६ रोजी नागपूर येथून १८:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५:३० वाजता नाशिक रोड येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01204 (अनारक्षित विशेष) दिनांक १३.०७.२०२६ रोजी नाशिक रोड येथून ०७:५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०:०० वाजता नागपूर येथे पोहोचेल.



थांबे: अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव आणि मनमाड.


दोन्ही गाड्यांची संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी, आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी -सह-गार्ड ब्रेक व्हॅन्स


अनारक्षित विशेष डब्यांची तिकिटे युटीएस प्रणालीद्वारे बुक करता येतील; यासाठी सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेले सामान्य दर आकारले जातील.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने