चार सुपरस्टार, एक गोल्डन बूट!

मेस्सी, एमबाप्पे, हालांड आणि केन यांच्यात चुरस


यंदाच्या फिफामध्ये मेस्सीचा अनुभव, एमबाप्पेचा वेग, हालांडची कुशलता आणि केनच्या सातत्यामुळे रंगलेली ऐतिहासिक 'गोल्डन बूट' शर्यत फुटबॉलप्रेमींना शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवेल.यंदाच्या फिफामध्येमेस्सीचा अनुभव, एमबाप्पेचा वेग, हालांडची कुशलता आणि केनच्या सातत्यामुळे रंगलेली ऐतिहासिक 'गोल्डन बूट' शर्यत फुटबॉलप्रेमींना शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवेल.


मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना सर्वांचे लक्ष आता केवळ विजेतेपदावर नाही, तर स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘गोल्डन बूट’ पुरस्काराकडेही लागले आहे. यंदा या पुरस्कारासाठी चार जागतिक दर्जाचे स्ट्रायकर आमने-सामने आले आहेत. अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी, फ्रान्सचा किलियन एमबाप्पे, नॉर्वेचा एर्लिंग हालांड आणि इंग्लंडचा हॅरी केन यांनी आपल्या दमदार कामगिरीने ही शर्यत अत्यंत रोमांचक बनवली आहे. त्यामुळे स्पर्धेतील उर्वरित प्रत्येक सामना गोल गोल्डन बूटच्या शर्यतीचा निकाल बदलू शकतो.



मेस्सीची जादू कायम



२०२२ विश्वविजेत्या अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी पुन्हा एकदा मोठ्या मंचावर आपली गुणवत्ता सिद्ध करत आहे. ४१० मिनिटांत ८ गोल झळकावत त्याने गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. ३९ वर्षीय मेस्सीने अनुभव, अचूकता आणि नेतृत्व यांचा उत्कृष्ट संगम दाखवत अर्जेंटिनाच्या आक्रमणाला नवी धार दिली आहे. निर्णायक क्षणी गोल करण्याची त्याची क्षमता आजही तितकीच प्रभावी आहे. या कामगिरीमुळे तो विश्वचषक इतिहासात एका स्पर्धेत ८ किंवा अधिक गोल करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत सामील झाला आहे.



हालांडची धडाकेबाज एंट्री


नॉर्वेचा एर्लिंग हालांड याचा हा पहिलाच विश्वचषक असला तरी त्याने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. अवघ्या ३६० मिनिटांत ७ गोल करत त्याने स्पर्धेतील सर्वात घातक स्ट्रायकर म्हणून ओळख निर्माण केली आहे. हालांडचा गोल रूपांतरण दर स्पर्धेतील सर्वोत्तम मानला जात आहे.




एर्लिंग हालांड : ७ गोल


देश : नॉर्वे
गोल : ७
खेळलेले मिनिटे : ३६०


विशेषता : सर्वोत्तम गोल रूपांतरण दर


किलियन एमबाप्पे : ७ गोल


देश : फ्रान्स
गोल : ७
असिस्ट : २


विशेषत: वेगवान आक्रमण आणि उत्कृष्ट फिनिशिंग




एमबाप्पेचा वेग आणि अचूकता


फ्रान्सचा सुपरस्टार किलियन एमबाप्पे सात गोल आणि दोन असिस्टसह शानदार फॉर्ममध्ये आहे. २०२२ विश्वचषकात गोल्डन बूट जिंकणाऱ्या एमबाप्पेने यंदाही त्याच लयीत खेळ सुरू ठेवला आहे. त्याचा वेग, ड्रिबलिंग आणि बचावफळीला भेदण्याची क्षमता प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. अंतिम टप्प्यात आणखी काही गोल केल्यास तो सलग दुसऱ्या विश्वचषकात गोल्डन बूट जिंकणारा खेळाडू ठरू शकतो.



विश्वचषक २०२२ गोल्डन बूट विजेता


गोल्डन बूटचा निर्णय कसा होतो?

संपूर्ण स्पर्धेत ज्या खेळाडूचे गोल सर्वात जास्त असतील, तो थेट 'गोल्डन बूट'चा विजेता ठरतो. तसेच ज्या खेळाडूने आपल्या सहकाऱ्यांना गोल करण्यासाठी सर्वात जास्त 'असिस्ट' (अचूक पास) दिले आहेत, त्याला विजेता घोषित केले जाते. जो खेळाडू या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर राहतो त्याला 'सिल्वर बूट' आणि तिसऱ्या क्रमांकावरील खेळाडूला 'ब्रॉन्झ बूट' दिला जातो.



हॅरी केन : ६ गोल 


इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याने ६ गोल आणि १ असिस्टसह आपल्या संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शर्यतीत तो सध्या चौथ्या स्थानावर असला तरी अंतिम टप्प्यात त्याच्याकडे परिस्थिती बदलण्याची क्षमता आहे. केनची पेनल्टी बॉक्समधील उपस्थिती, अचूक कौशल्य आणि संघासाठी खेळण्याची वृत्ती त्याला इतरांपेक्षा वेगळे ठरवते.




देश : इंग्लंड
गोल : ६
असिस्ट : १
संघाचा कर्णधार

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून