Nashik News: नाशिकच्या आश्रम शाळेत संतापजनक घटना !अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील कळवण (Kalwan) तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. कळवण येथील मोहनदरी येथील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रम शाळेत (Mohandari Government Tribal Residential Ashram School) शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने चक्क एका बाळाला जन्म दिला आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण नाशिक (Nashik) जिल्हा हादरला आहे.


या गंभीर प्रकरणानंतर आदिवासी विकास विभागाच्या (Tribal Development Department) आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा आणि देखरेखीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. आश्रमशाळेत एवढा गंभीर प्रकार घडतोच कसा असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Kalwan Police Station)  तातडीने पावले उचलत गुन्हा दाखल केला असून, संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे.



नेमकं प्रकरण काय ?


पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीवर दुसरं तिसरं कोणीच नाही तर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या अत्याचारामुळे संबंधित पीडित विद्यार्थिनी गरोदर राहिली आहे अशी माहिती आहे. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात (Kalwan Police Station) पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात (Juvenile Reformatory) रवानगी करण्यात आली आहे.


आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा (Dinkar Pavra) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या अत्यंत संवेदनशील घटनेला अधिकृत दुजोरा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधितांची खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आश्रम शाळेच्या प्रशासनाकडून एवढा मोठा हलगर्जीपणा कसा झाला , याची तपासणी सध्या केली जात आहे.



आरोग्य तपासणी यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह


दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर निवासी आश्रम शाळांमध्ये होणाऱ्या आरोग्य तपासणी यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आश्रम शाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमितपणे दैनंदिन आरोग्य तपासणी होते, असे असतानाही विद्यार्थिनी गरोदर (Pregnant) राहिली आणि तिने बाळाला जन्म दिला, तरीही एवढी मोठी बाब आश्रम शाळा प्रशासनाच्या, शिक्षकांच्या किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात कशी आली नाही, याबाबत आता संताप व्यक्त केला जात आहे. या निष्काळजीपणामुळे आश्रम शाळांमधील देखरेख व्यवस्था किती खिळखिळी झाली आहे, हेच स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण